शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

भूजल पातळीत ३ मीटरने घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 12:03 AM

मागील पाच वर्षांच्या तुलनेत पाणीपातळी ३ मीटरपर्यंत घटली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात यंदा वार्षिक सरसरीच्या तुलनेत ५० टक्के पाऊस झाल्यामुळे दिवसेंदिवस पाणीपातळी कमालीची खालावत असून, मागील पाच वर्षांच्या तुलनेत पाणीपातळी ३ मीटरपर्यंत घटली आहे. पुढील दोन महिने तीव्र उन्हाचे जाणार असल्याने पाणीपातळी आणखी घटणार असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प कोरडेठाक पडलेले आहेत. परिणामी, सध्या टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहेत. जिल्ह्यात सध्या साडेतीनशे टँकरने पाणीपुरवठा होत असून ही संख्या येत्या काही दिवसांत वाढणार आहे. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या वतीने जलस्त्रोत असलेल्या ११० विहिरींची पाणीपातळी मोजण्यात आली. मागील पाच वर्षांतील मार्चमधील सरासरी पाणी पातळीच्या तुलनेत ३ टक्क्यींनी घट झाली आहे.मार्चच्या सुरुवातीपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. वाढते तापमान पाहता उपलब्ध पाण्याचे बाष्पीभवन होत आहे.एप्रिल मे आणि जूनमध्ये पावसाचे आगमन होईपर्यंत मोठ्या प्रमाणात टंचाई भेडसावणार आहे. अशा परिस्थितीत पावसाच्या पाण्याचा पूर्ण उपयोग करणे महत्त्वाचे आहे.दरम्यान, जिल्हाभरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.जलबचतीसाठी सोशल मीडियाचा वापरमार्चमध्ये करण्यात आलेल्या पाहणीत जिल्ह्यातील भूजल पातळी सरासरी ३ मीटरने खालावली आहे. पाण्याचे वाढते दुर्भिक्ष्य लक्षात घेता सामाजिक संघटना विविध उपक्रम राबवत आहेत. तर सोशल मीडियावरही थेंबथेंब वाचविण्यासाठी जलबचतीचा संदेश दिला जात आहे. पाण्याचे जतन करणे, योग्य वापर करणे, अनमोल ठेवा म्हणून पाणी हाताळणे यासाठी इतरांना प्रेरित करण्यासाठी जल अभियान देखील राबविण्यात येत आहे.जाफराबाद तालुक्यात सर्वाधिक ४ मीटरने पाणी पातळी खालावली आहे. जाफराबाद, भोकरदन तालुक्यांकडे पावसाने पाठ फिरवल्यामुळे येथील जवळपास सर्वच प्रकल्प कोरडेठाक पडलेले आहेत. त्यामुळे भोकरदन व जाफराबाद तालुक्यांत सर्वाधिक टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. येणाऱ्या काळात तीव्र पाणीटंचाई येथे भासणार आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळ