बाजार भावामध्ये अनेकदा चढ-उतार होत असतात. या अनुषंगाने शेतकऱ्यांना नोंदणी करून ठेवणे अतिशय महत्त्वाचे असल्याचे डोंगरे यांनी सांगितले. २८ डिसेंबरपासून नाफेड हमीभाव तूर खरेदी केंद्र आयडीयल अग्रिटेक कंपनी सावरगाव (ता. जालना) येथे नोंदणी सुरू करण्यात आली आहे. यासाठी सन २०२०- २१ चा पीक पेरा टाकलेला ७/१२, आधार कार्ड व बँक पास बुकची प्रत कंपनीचे कार्यालय सावरगाव येथे ऑनलाइन नोंदणी करणे गरजेचे आहे. यंदा ठरवून दिलेल्या हमी भावानुसार तुरीला सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर हरभऱ्याला ५ हजार १०० रुपये प्रति क्विंटल दर निश्चित केला आहे. शेतकऱ्यांनी हमीभाव योजनेचा अधिकाधिक लाभ घेण्यासाठी लवकरात- लवकर नोंदणी करावी, असे आवाहनही डोंगरे यांनी केले आहे.
हमीभावाने तूर खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 4:41 AM