लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मागील अनेक दिवसांपासून धूळ खात पडलेली क्रीडाधिकारी कार्यालयातील व्यायामशाळा आता कात टाकणार आहे. दुरूस्तीसाठी तीन लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, यातून व्यायाम शाळेच्या भिंतींची दुरूस्ती, रंगरंगोटीसह इतर सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.व्यसनाकडे वळालेल्या युवकांनी व्यायामाकडे लक्ष द्यावे, यासाठी शासनाच्या वतीने जिल्हास्तरावर व्यायाम शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. या शाळांमध्ये शुल्क कमी आकारले जात असल्याने तरुणांचाही याकडे मोठ्या प्रमाणात कल असतो. परंतु, लाखो रुपये खर्च करुन उभारण्यात आलेल्या जालना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील व्यायाम शाळेची दुरवस्था झाली होती. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने मागील अनेक वर्षांपासून ही शाळा धूळ खात पडली होती.क्रीडा अधिकारी प्रमोदिनी अमृतवाड यांनी या व्यायाम शाळाकडे लक्ष दिले. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडे व्यायामशाळा दुरुस्तीचे गºहाणे मांडले.व्यायाम शाळा दुरुस्तीबाबतच्या प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांनी हिरवा कंदिल दाखवित व्यायाम शाळा दुरुस्तीला ३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला.सध्या व्यायाम शाळाच्या दुरुस्तीचे काम सुरु असून लवकरच हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचेही क्रीडा अधिकारी प्रमोदिनी अमृतवाड यांनी सांगितले.दरम्यान, क्रीडा अधिकारी कार्यालयातील व्यायाम शाळेच्या इमारतीच्या रंगरंगोटीचे काम करण्यात येत आहे. तसेच शौचालयाची दुरुस्ती करणे, नवे पत्रे बसवणे इ. कामे करण्यात येणार आहेत.या व्यायामशाळेची दुरुस्ती करण्याचे काम एका एजन्सीला देण्यात आले आहे.विभागीय आयुक्तांनी मागितला क्रीडांगणाचा अहवालजालना शहरात जिल्हा क्रीडांगण आहे. परंतु, या क्रीडांगणाची दुरवस्था झालेली आहे. क्रीडांगणातील भिंती पडल्या आहेत. तर बैठक व्यवस्थेची ही दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे खेळाडूंनी या मैदानाकडे पाठ फिरवली होती. या मैदानाच्या दुरुस्तीबाबत विभागीय आयुक्तांनी अहवाल मागितला असून, तो अहवाल लवकरच विभागीय आयुक्तांना पाठविण्यात येणार आहे.जुन्या साहित्याचा करणार वापरया व्यायामशाळेतील साहित्याचा वापर नसल्यामुळे हे साहित्य खराब झाले आहे. या साहित्यातील जे साहित्य खराब झालेले नाही, त्याचा वापर करण्यात येणार आहे. तसेच नव्या साहित्यासाठीही निधी मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले.
धूळ खात पडलेल्या व्यायामशाळेचे रुपडे पालटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 12:37 AM