लोकमत न्यूज नेटवर्कसुखापुरी : अंबड तालुक्यातील सुखापुरी महसूल मंडळात गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस खूपच कमी म्हणजेच २६० मि.मी.झाला असताना देखील सुखापुरी येथील कष्टाळू शेतकरी तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शिपाई अंकुश लहूटे यांनी त्यांच्या दोन एकर मोसंबीच्या बागेत पपई पिकाची अंतर्गत लागवड करून ऐन दुष्काळात लाखो रुपयांची कमाई केली असल्याने परिसरातील शेतकरी त्यांची शेती पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.दोन एकर शेतीत लहुटे यांनी जून २०१६ ला मोसंबी या बागायती पिकांची लागवड केली होती. योग्य नियोजन केल्यामुळे मोसंबी बागायतीची शेती देखील चांगल्या पद्धतीने बहरली.यावर्षी चांगला पाऊस होईल या आशेने फेब्रुवारी २०१८ मध्ये सोलापूर जिल्हातील मोहोळ या गावातून तैवान जातीची सुमारे १७०० रोपे १० रुपये प्रमाणे विकत आणून मोसंबी असलेल्या शेतातच अंतर्गत योग्य प्रकारे नियोजन करून लागवड केली. परंतु केवळ जून महिन्याच्या सुरुवातीला थोडा पाऊस झाला.नंतर पाऊसच नसल्याने सुखापुरी महसूल मंडळातील खरिपाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तसेच ज्या शेतकऱ्यास मुबलक पाणी होते, त्या विहीर, बोअर संपूर्णपणे कोरडेठाक पडले.
सुखापुरीत कमी पाण्यावर फुलविली पपईची शेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 12:40 AM