जालना : जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असून, बुधवारी तब्बल १९२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. विशेषत: यात जालना शहरातीलच १०९ जणांचा समावेश आहे. कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दोन रुग्णांचाही बुधवारी मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मार्च महिन्यातील तीन दिवसांत ही रुग्णसंख्या शंभरावर राहिली आहे. जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात तब्बल १९२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, दोघांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. बाधितांमध्ये जालना शहरातीलच तब्बल १०९ जणांचा समावेश आहे. तालुक्यातील अहंकार देऊळगाव- १, नेर- १, भाटेपुरी- १, कार्ला- १, वखारी- १, पीर पिंपळगाव येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मंठा शहरातील एक, वाई येथील एक व तळणी येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. परतूर शहरातील एकाला बाधा झाली आहे. घनसावंगी शहरातील एक, भुतेगाव - १, कुंभार पिंपळगाव- ३, राजाटाकळी येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अंबड शहरातील ११ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर भराडी - १, कवडगाव - १, जोगेश्वरवाडी-१, महाकाळा - १, बदनापूर शहर - १, शेलगाव - ४, चितोडा - १, कंडारी-१ व आन्वी येथील एकाला बाधा झाली आहे. जाफराबाद शहरातील दोन, वरूड- २, किन्होळा- १, गोंदखेडा- १, कुंभारझरी- १, टेंभुर्णी - २, निमखेडा- १ व माहोरा येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. भोकरदन शहर- ३, फत्तेपूर - १, लेह - १, बरंजळा लोखंडे -१, कोडोली - १, आलापूर - २, जवखेडा - १, मोहलाई - १, लोणगाव - २, चांदई येथील एकाला कोरोनाची लागण झाली आहे. शिवाय बुलडाणा जिल्ह्यातील ११, परभणी जिल्ह्यातील ४ व औरंगाबादेतील एकाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
१२१ जण कोरोनामुक्त
कोविड रुग्णालयातील यशस्वी उपचारानंतर १२१ जण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना बुधवारी घरी सोडण्यात आले आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या १५ हजार ८९८ वर गेली असून, त्यातील ३९८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर यशस्वी उपचारांनंतर १४ हजार ६१२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
अलगीकरणात ३१ जण
जिल्ह्यातील दोन संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ३१ जणांना ठेवण्यात आले आहे. यामध्ये जालना शहरातील वन प्रशिक्षण केंद्रात २४ जणांना व घनसावंगी येथील मुलींच्या वसतिगृहात सातजणांना ठेवण्यात आले आहे. तेथे त्यांची नियमित तपासणी करून औषधोपचार केले जात असल्याचे सांगण्यात आले.