चौकट
पॉझिटिव्ह असल्याचे कळताच पोलीस हादरले
मंगळवारी सकाळी झालेल्या अपघातातील मयत राजू पंडितराव गायकवाड हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे नातेवाइकांकडून पोलिसांना कळाले. त्या वेळी सर्वत्र भीती व्यक्त केली गेली. अपघात झाल्यावर घटनास्थळी भेट देणाऱ्या पोलिसांनी त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेत टाकला होता. त्यामुळे पोलीसही हादरले आहेत. विशेष म्हणजे उपचार सुरू असताना रुग्ण बाहेर येतोच कसा, असा सवाल करण्यात आला.
चौकट
गाडीची चावी ठरली घातक
कोरोना पॉझिटिव्ह आल्यावर राजू गायकवाड हे रुग्णालयात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांच्याकडे दुचाकीची चावी होती. त्यांनी कुठले तरी निमित्त करून रुग्णालयातून पळ काढला आणि गाडी घेऊन ते औरंगाबाद मार्गावर गेल्यानेच ते दगावले. त्यांच्याकडे गाडी नसती तर ते बाहेर जाऊच शकले नसते, असे पोलिसांनी सांगितले.