भोकरदन : शहरातील मोहम्मदिया मस्जिद परिसरातील नाल्या ठिकठिकणी तुंबल्या आहेत. त्यामुळे दुर्गंधी पसरत असून, या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गत अनेक वर्षांपासून या भागातील अस्वच्छतेचा प्रश्न कायम असून, नगरपालिका दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप हाेत आहे.भोकरदन शहरातील मोहम्मदिया मस्जिद परिसर बाजार गल्ली प्रभागात मागील २४ मध्ये एक ना अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. निवडणुकीत आश्वासन देणारे निवडणुकीनंतर याकडे दुर्लक्ष करीत आहेत. या भागातील नागरिकांनी समस्या सोडवाव्यात, यासाठी निवेदने दिली. परंतु, त्या निवेदनांनाही कचराकुंडी दाखविण्यात आली आहे. या भागातील अनेकांच्या घरातील सांडपाणी रस्त्यावर येत असून, ठिकठिकाणी हे पाणी तुंबले आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरत असून, डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. विशेषत: अस्वच्छ पाण्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये होणारे वादविवादही वाढले आहेत.
स्वच्छता अभियानाचा बोजवारा
नगरपालिका प्रशासनाकडून भोकरदन शहरात स्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छतेची मोहीम राबवित आहे. परंतु, मोहम्मदिया मस्जिद परिसर, बाजार गल्ली भागासह शहरातील इतर ठिकाणच्या नाल्या आणि कचरा पाहता स्वच्छता अभियानाचाही बोजवारा उडाल्याचे दिसत आहे.
फोटो