लोकमत न्यूज नेटवर्कजालना / परतूर : जालना शहरासह परिसरात बुधवारी सायंकाळी रिमझिम पावसाने हजेरी लावली. तर परतूर तालुका व परिसरात दमदार पाऊस झाला. या पावसामुळे या भागातील खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे.जालना शहर व परिसरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सायंकाळी आलेले ढग पाहता मोठा पाऊस पडेल, अशी आशा होती. मात्र, रिमझिम पाऊस झाला. शहरासह परिसरातही हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला.परतूर तालुक्यात बुधवारी सायंकाळच्या सुमारास दमदार पाऊस झाला. सुरूवातीस पडलेल्या अल्प पावसावर शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या उरकल्या होत्या. पेरण्यांनंतर पंधरा ते वीस दिवसानंतर या पावसाचे आगमन पिकांना जीवदान मिळाले असून, शेतकऱ्यांच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत. तालुक्यातील नदी, तलाव व विहिरी अद्यापही कोरड्या असून, मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. शिवाय बदनापूर शहरासह तालुक्यातील काही गावांमध्ये, अंबड तालुक्यातील मठपिंपळगाव व परिसरातही पावसाने हजेरी लावली.
परतूर तालुक्यात दमदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 1:07 AM