लोकमत न्यूज नेटवर्कजालना : देश मेरा रंगीला.. सबसे आगे होगे... हिंदुस्थानी यासह अनेक जुन्या, नव्या गाण्यांचा संगम साधत विद्यार्थ्यांनी सभागृहात रंग भरला होता.स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून लोकमत टाईम्स कॅम्पस क्लबतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही देशभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धेचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. ही स्पर्धा शहरातील अनिल जिंदल वर्ल्ड स्कूलमध्ये पार पडली. या स्पर्धेचे दिपप्रज्वलन रतन नगरकर, शैला कुलकर्णी, शुभांग़ी देशपांडे, अनिल जिंदल वर्ल्ड स्कूलचे प्राचार्य प्रवीण झियर, लोकमत जालना शाखा व्यवस्थापक मकरंद शहापूरकर, लोकमत टाईम्सचे जिल्हा प्रतिनिधी नूर अहेमद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रवीण झियर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले.या स्पर्धेचे परीक्षक म्हणून रतन नगरकर, शैला कुलकर्णी, शुभांगी देशपांडे यांनी काम पाहिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया भन्साली यांनी तर आभार प्रदर्शन नूर अहेमद यांनी केले. हा कार्यक्रम अनिल जिंदल वर्ल्ड स्कूल, श्रीनिवास डेकोरेशन, ओंकार डिजिटल ग्राफिक्स यांच्या सहकार्याने पार पडला.या देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेत जालन्यातील ८ शाळांनी सहभाग नोंदविला होता. पोदार इंटरनॅशनलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले, त्यांना प्रथम पुरस्कर देण्यात आला, तर द्वितीय पुरस्कार गोल्डन ज्युबिली इंग्रजी शाळेच्या विद्यार्थ्यानी मिळविला. तर तृतीय पारितोषिक रिषी विद्या इंग्रजी शाळेने मिळविला. यासह दोन उत्तेजणार्थ बक्षीस देण्यात आले. त्यात अंकुर विद्या मंदिर इंग्रजी शाळा आणि अनिल जिंदल वर्ल्ड शाळेला मिळाला आहे. या संपूर्ण विजेत्या स्पर्धकांचे लोकमत कॅम्पस क्लबतर्फे अभिनंदन करण्यात आले.स्पर्धेत सहभागी शाळापोदार इंटरनॅशनल इंग्रजी शाळारिषी विद्या इंग्रजी शाळागोल्डन ज्युबिली इंग्रजी शाळाएम.एस. जैन इंग्रजी शाळाअनिल जिंदल इंग्रजी शाळाकिडस् कॅम्ब्रिज इंग्रजी शाळाअंकुर विद्या मंदिरबी.पी. उगले इंग्रजी शाळाआदी शाळांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदविला होता.
सब से आगे होगे हिंदुस्थानी, देश मेरा रंगीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 12:54 AM