बॉडी बिल्डिंगला महत्त्व
जालना पोलीस दलातील युवक पोलीस कर्मचारी किशोर डांगे यांना लहानपणापासूनच व्यायामाची गोडी होती. त्याचे रूपांतर त्याने चांगल्या करिअर करण्यात केले. आज किशोर डांगेने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर शरीरसौष्ठव स्पर्धेत सहभाग नोंदवून जालन्यासह पोलीस दलाचे नाव उंचावले असल्याचे दिूसन आले. यामुळे तणावही हलका होतो.
संगणकात मास्टरकी
वडील पोलीस दलात होते. त्यामुळे आपणही पोलीसमध्ये दाखल झालो. संगणकाची आवड असून, त्यात दोन सुर्वणपदक मिळविले आहेत.
केक बनविण्याला प्राधान्य
वडील पोलीस दलात हाते. त्यामुळे आपल्याला वर्दीचे ॲट्रेक्शन होते. त्यातून आपण पोलीस दलात रुजू झाल्याचे सध्या एलसीबीत कार्यरत असलेल्या नंदा भट यांनी सांगितले. ताणतणावातून मुक्त होण्यासाठी केक तयार करण्याची आवड होती. ती आजही जोपासली आहे. पोलिसांसह अन्य नागरिकांकडूनही केकला मोठी मागणी असल्याने कर्तव्य बजावून ही आवड आपण जपत आहोत.
भजन, कीर्तनात रंगतो...
पोलीस दल म्हटले की, ताण हा आलाच. परंतु, तो दूर करण्यासाठी आपण भजन, कीर्तनात रमतो. यातून आध्यात्मिक आनंद मिळत असल्याचे योगेश गायके यांनी सांगितले.