विकास व्होरकटे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सध्या मराठी रसिकांच्या मनावर वेगवेगळ््या मालिका राज्य करीत आहेत. यातील एक म्हणजे ‘स्वराज्य रक्षक, संभाजी महाराज’ ही मालिका प्रेक्षकांमध्ये चांगलीच गाजली आहे. यात विशेष म्हणजे डॉ. अमोल कोल्हे, स्नेहलता वसईकर यांसारख्या रांगड्या कलाकारांचा मुख्य अभिनय असलेल्या लोकप्रिय मालिकेत जालना तालुक्यातील पोकळ वडगावचा गजानन उजेड कलाकार काम करीत आहे. गेल्या काही भागांपासून गजानन प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.मुळचा पोकळ वडगाव या खेड्यात गजानन उजेड हा केवळ अभिनयाच्या वेडापायी काही वर्षांपूर्वी मुंबईत गेला आणि पाहता- पाहता गजानन ‘राधा प्रेम रंगी रंगली’, ‘आवाज संत ज्ञानेश्वर’, व सध्या नव्याने सुरु झालेली ‘बाळू मामाच्या नावाने चांगभलं’ अशा विविध मालिकांमधून वेगवेगळ्या मराठी चॅनल्सवर झळकत आहे. याशिवाय अंद्धश्रद्धेवर पलटवार ही शॉर्ट फिल्म देखील त्याने केलेली आहे. मराठीतील ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर यांच्यासोबत ‘हुतात्मा वेब सिरीज’ आणि युवा अभिनेता टायगर श्रॉफ याची मुख्य भूमिका असलेल्या ‘स्टुडंट आॅफ द यीअर टू’ या चित्रपटातही काही भूमिका गजाननने केल्या आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपासून त्याला एका मराठी चॅनल्सवरील स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत डॉ. अमोल कोल्हे सारख्या कलावंतासोबत मावळ््याचा अभिनय करण्याची संधी मिळालेली आहे. यामुळे येणाऱ्या काळात गजानन मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत महत्त्वाच्या भूमिका करताना दिसला तर नवल नाही !अभिनयाची आवड जोपासलीगजानन उजाड हा कोणत्या नाट्यशास्त्र विभागाचा विद्यार्थी नाही, ना त्याने कुठे अभियनाचे धडे गिरविलेले. फक्त अस्सल अभिनयाची आवड असल्यानेच हा गजानन टीव्हीवर झळकला. गजानन लहानपणी टीव्ही. पाहण्यासाठी शेजाऱ्यांच्या घरी गेला. यावेळी त्याला घराबाहेर काढण्यात आले होते. हाच राग मनात धरून मीही एक दिवस टीव्हीवर दिसणार एवढीच खूणगाठ मनाशी बांधून गजानन प्रयत्न करीत राहिला आणि आता तो खरोखरच दूरचित्रवाणीवर आला.
पोकळ वडगावचा कलाकार चित्रपटसृष्टीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 12:23 AM