शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

कोरोनावर मात करण्यासाठी घरपोच सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 11:23 PM

अंबड (जि.जालना) नगर पालिकेने औषधे, किराणा, भाजीपाला आदी जीवनावश्यक साहित्य घरपोच करण्याचा निर्णय घेतला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : जीवनावश्यक साहित्य खरेदीच्या नावाखाली नागरिक घराबाहेर पडत आहेत. नागरिकांनी घरातच रहावे, यासाठी आता अंबड (जि.जालना) नगर पालिकेने औषधे, किराणा, भाजीपाला आदी जीवनावश्यक साहित्य घरपोच करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार व्यावसायिकांची यादी तयार करण्यात आली आहे. शिवाय कोरोनाबाबत घ्यावयाच्या दक्षतेचे स्टीकरही दारोदारी बसविण्यात आले आहेत.कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आला आहे. मात्र, जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याच्या नावाखाली अनेकजण रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे किराणा दुकान, भाजीपाला खरेदीसाठी गर्दी होत आहे. ही बाब पाहता सोशल डिस्टंसिंगसाठी अंबड नगर पालिकेचे मुख्याधिकारी सागर घोलप यांनी शहरातील औषध विक्रेते आणि किराणा व्यावसायिक संघटनेची बैठक घेऊन घरपोच सेवा करण्याची विनंती केली. त्यास संबंधित व्यवसायिकांनी प्रतिसाद दिला. तसेच कर्मचाऱ्यांमार्फत शहरातील भाजीपाला विक्रेते व फळ विक्रेत्यांचे संपर्क क्रमांक घेण्यात आले आहेत. संबंधितांची यादी तयार करून अंबड शहरातील विविध व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपद्वारे ती फिरविण्यात आली आहे. घरपोच सेवा देणाऱ्यांना पालिकेने ओळखपत्र तयार करून दिले आहेत.कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरात एक रिक्षा लावून जागृती केली जात आहे. नागरिकांनी घ्यावयाची दक्षता, घरपोच साहित्य पुरवठा याची माहितीही नागरिकांना दिली जात आहे. एका ट्रॅक्टरच्या माध्यमातून शहरात निर्जंतुकीकरणाची फवारणी सुरू करण्यात आली आहे. यादी तयार करण्यासह शहर स्वच्छतेसाठी मुख्याधिकारी सागर घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली नगर पालिकेतील कपिल राहटगावकर, विलास खरात, आत्माराम भांगे, गौतम पारधे, गोपाळ चौधरी, भारत जाधव आदींनी प्रयत्न केले. नागरिकांनी घराबाहेर न पडता कोरोनाशी लढा द्यावा, यासाठी घरपोच साहित्य पुरविण्याचा उपक्रम अंबड पालिकेने हाती घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील इतर नगर पालिका, नगर पंचायतींसह ग्रामपंचायतींनी उपक्रम राबविला तर कोरोनाशी लढा देण्यास मोठी मदत होणार असून, पोलीस प्रशासन, आरोग्य यंत्रणेवरील ताणही कमी होणार आहे. दरम्यान, शहरातील नागरिकांनीही अत्यावश्यक सेवांसाठी घराबाहेर न पडता घरपोच साहित्य मागवावे, विनाकारण घराबाहेर पडणा-यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHomeघरvegetableभाज्याcivic issueनागरी समस्या