लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राष्ट्रीय आरोग्य अभियान व आरोग्य विभागांतर्गत शनिवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या आरोग्य कर्मचा-यांना डॉ. आनंदीबाई जोशी व अन्य पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.यावेळी जि.प. अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, मुख्यकार्यकारी अधिकारी नीमा अरोरा, उपाध्यक्ष सतीश टोपे, सभापती रघुनाथ तौर, सुमनबाई घुगे, जिल्हा शल्यचिकित्सक एम. डी. राठोड, राजेंद्र पाटील, कैलास चव्हाण, यादवराव राऊत, विमल आगलावे, यांची उपस्थिती होती. आगामी काळात आरोग्य शिबिराचे आयोजन करुन ग्रामीण महिलांच्या आरोग्य समस्या दूर करण्यासाठी नियोजन करण्यात येणार असल्याचे खोतकर म्हणाले. उपस्थित इतर मान्यवरांची आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी मान्यवरांच्या स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देवून पुरस्कारार्थींचा सन्मान करण्यात आला.संतोष जाधव यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. अमोल गिते यांनी आभार मानले. या कार्यक्रमास आशा सेविका, आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेविका आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राच्या दुरुस्तीसाठी विशेष बाब म्हणून आपण राज्य शासनाकडून दोन कोटी साठ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या माध्यमातून दुरुस्तीची कामे दजेर्दार पध्दतीने करुन घेण्याच्या सूचना अध्यक्ष खोतकर यांनी संबंधित अधिकाºयांना दिल्या.
आरोग्य सेविकांचा पुरस्काराने सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 1:09 AM