लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : दुष्काळी भागात येणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. मात्र, विमा कंपनी शेतक-यांना नुकसानभरपाई म्हणून विमा संरक्षण न देता शेतक-यांना भूलथापा मारत आहे. ज्या शेतक-यांना फळपीक विमा मिळाला नाही अशा शेतक-यांकडून परत नव्याने फाईल जमा करणे सुरू केले आहे.भारत सरकार, महाराष्ट्र शासन व दी न्यू इंडिया एशोरन्स कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने फळपीक विमा योजना राबविली जात आहे. एका वर्षापूर्वीच शेतक-यांनी फळपीक विम्याची रक्कम आॅनलाइन विमा कंपनीकडे जमा केली आहे. असे असताना कंपनी शेतकºयांना विम्याची रक्कम न देता आता नव्याने भोकरदन येथे शिबीर घेण्यात आले. यात कागद पत्रांची पूर्तता करण्यास सांगून फळपीक उत्पादक शेतक-यांच्या फाईल जमा करून घेत आहे.विशेष म्हणजे जाफराबाद तालुक्यातील शेतक-यांसाठी हे शिबीर जाफराबादला घ्यायला हवे होते. मात्र, तसे न होता येथील शेतक-यांना भोकरदनला बोलविण्यात आले. यामुळे शेतक-यांमध्ये नाराजी पसरली आहे. विशेष म्हणजे विमा हप्ता भरतांना शेतक-यांनी आवश्यक त्या कागद पत्रांची पूर्तता केलेली आहे. मात्र, आता पुन्हा कंपनीचे अधिकारी मनमानी पध्दतीने सात बारा नोंदीसह तलाठी, गटअधिकारी, कृषी अधिकारी यांचा पेरणी अहवाल, लागवडीचे पत्र, रेखांश व अक्षांश तारीख व वेळेसहित फळबागचे छायाचित्र फाईल सोबत घेत आहे.एकीकडे दुष्काळाशी दोन हात करताना फळबागा जगविणे मुश्किल झाले आहे. अद्यापही मोठा पाऊस न झाल्याने पाण्याचा प्रश्न कायम उभा आहे. भविष्यात बागा जगवायच्या कशा? यासह इतर अनेक प्रश्न शेतक-यांसमोर उभा आहेत. त्यात आता प्रशासन आणि विमा कंपनीच्या मनमानी कारभारामुळे फळबागा जोपासणाºया शेतकºयांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. कागदपत्रांची जमवाजमव करताना शेतक-यांच्या नाकी नऊ येत आहेत. ही बाब लक्षात घेऊन प्रशासकीय अधिकाºयांनी गतवर्षी भरलेल्या विमा हप्त्यानुसार अनुदान द्यावे, यासह इतर मागण्या शेतकरी वर्गातून केल्या जात आहेत.
भर दुष्काळात पीक विमा कंपनीचे वरातीमागून घोडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2019 1:09 AM