लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गूळ मार्केटमध्ये गुळ खरेदी- विक्री व्यवहारासाठी शेड नसल्याने सर्व व्यवहार उन्हातच करावे लागत आहे. वाढत्या उन्हामुळे गुळाच्या भेल्या पघळत असल्याने व्यापाऱ्यांची गैरसोय होत आहे.मराठवाड्यातील लातूरनंतर जालना येथील गूळ मार्केट मोठे आहे. नांदेड, लातूर, औरंगाबादच्या काही तालुक्यातून येथील गूळ मार्केटमध्ये गुळाची आवक होत आहे. सध्या गुळाचा हंगाम सुरू आहे. गूळ बाजारात सध्या दहा ते पंधरा हजार गुळाच्या भेल्याची आवक आहे. मात्र आलेला शेतक-यांचा माल उतरविण्यासाठी गूळ बाजारात शेड नसल्याने गैरसोय सुरू आहे. गूळ खरेदी विक्रीसाठी बांधण्यात आलेले शेडमध्ये नाफेडची तूर खरेदी सुरू आहे. यामुळे गूळ बाजारात आलेला माल कडक उन्हातच उतरून मोजमाप करावे लागत असल्याचे पहावयास मिळत आहे. काही वर्षापूर्वी गूळ मार्केट समोर असलेल्या गोदामात गूळ खरेदी विक्रीचे व्यवहार होत. मात्र बाजार समितीने सदर गोदामात शेतक-यांचा तारण ठेवलेला शेतमाला ठेवण्यास येत आहे. तेव्हापासून गूळ व्यापा-यांची चांगलीच गैरसोय सुरू आहे. गूळ व्यापा-यांची गैरसोय होऊ नये म्हणून बाजार समितीने गूळ मार्केट परिसरातच गूळ खरेदी विक्रीसाठी मोठे शेड उभारून दिले होते.मात्र शेड चारही बाजूने खुले असल्याने खरेदी विक्रीसाठी अडचणीचे ठरत असल्याचे व्यापा-यांचे म्हणणे आहे. ज्या परिसरात गूळ व्यापा-यांची दुकाने आहेत. त्याच ठिकाणी शेड उभारून उन्हाळ्यात व्यापा-यांची होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी गूळ व्यापा-यांसह खरेदीदारांनी केली आहे.दिवसेदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. गुळाचा हंगाम असल्याने नियमित बाजारात पंधरा ते वीस हजार भेल्या गूळ मार्केटमध्ये येत आहे. मात्र गुळाची खरेदी विक्री व्यवहार भर उन्हातच करावे लागत असल्याने गुळ पघळून गुळाचे नुकसान होत आहे. यामुळे व्यापारी, शेतकरी गुळाच्या संरक्षणासाठी प्लास्टिकच्या ताडपत्रीचा वापर करत आहेत.
जालन्यात उन्हात पघळतोय गूळ..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 1:01 AM