लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : शहरातील बेघर, निराधारांना आता आपले स्वत:चे हक्काचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नुकतेच नगरपालिका प्रशासनाने शहरातील नागरिकांचा सर्व्हे केल्याची माहिती नगराध्यक्ष मंजूषा देशमुख यांनी दिली.ज्याला राहण्यासाठी घर नाही, अशा निराधार गरजू नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासनाच्या योजना सर्वसामान्यापर्यंत पोहचविण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. भोकरदन नगर परिषद आणिई-सोल्युशन इंडिया संस्थेकडून २७ व २८ जून रोजी मोहीम राबवून गरजू नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. फुटपाथ चौकात किंवा बस स्थानक परिसरात नगर परिषद हद्दीत कोणतेही घर नसलेले बेघर असे निराधारांचे सर्वेक्षण करण्यात आले. तर काहीचा सर्वे करण्यात येत आहे.ज्यांना राहण्यासाठी घरच नाही, अशा नागरिकांना संभावित निवारा देण्यासाठी बेघरांच्या सर्वेक्षणाद्वारे सर्वसाधारण तपशील कौटुंबिक सामाजिक, आर्थिक परिस्थिती आरोग्य स्थिती संदर्भात तपशील नगर पालिका प्रशासनाकडून गोळा करण्यात येत असल्याचे मुख्याधिकारी डॉ. अमित कुमार सोंडगे यांनी सांगितले.
भोकरदन शहरातील निराधार, गरिबांना मिळणार हक्काचे घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 1:22 AM