लोकमत न्यूज नेटवर्कअंकुशनगर : अंबड तालुक्यातील चुर्मापुरी येथील हनुमाननगरमध्ये रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, एकाच रात्री दोन घरफोड्या केल्या. सोन्या- चांदीच्या दागिन्यांसह १ लाख ११ हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. दरम्यान, सध्या जिल्हाभरात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच चोरटे धुमाकूळ घालत असल्याने शेतकऱ्यांवर दुष्काळात तेरावा महिना म्हणण्याची वेळी आहे.उन्हाळ््याचे दिवस असल्याने रात्री ग्रामस्थ घराच्या छतावर झोपण्यासाठी जात आहेत. याच संधीचा फायदा घेत रविवारी मध्यरात्री चुर्मापुरीमधील हनुमाननगर येथील दोन घरांवर चोरट्यांनी डल्ला मारला. येथील बबरुन बजुगडे हे आपल्या शेतात पाणी देण्यासाठी गेले होते. त्यांच्या घरी त्यांची पत्नी व दोन मुले झोपलेले होते. चोरट्यांनी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास त्यांच्या दरवाज्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरामध्ये असलेल्या पेट्या व कपाटातील सामानाची नासधूस केली. परंतु, त्यांच्या घरात चोरट्यांना फक्त ३ हजार रुपये रोख रक्कम मिळाली. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा शेजारी असलेल्या लक्ष्मण कोंडीबा रसाळ (६०) यांच्या घराकडे वळविला. रसाळ कुटुंब हे गरमीमुळे घराच्या छतावर छोपलेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घराच्या पाठीमागे असलेल्या दरवाज्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.त्यानंतर कपाटाची मोडतोड केली. कपाटात विहिरीच्या कामासाठी ठेवलेले ६८००० हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. त्यानंतर तीन पेट्या उचलून घरापासून जवळच असलेल्या खदानीत नेऊन टाकल्या. या पेट्यांमधील ४० हजार रुपये तसेच ९ ते १० तोळे सोने असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.दरम्यान, बबरुन बजगुडे हे पहाटे तीन वाजेच्या सुमारास शेतातून घरी आले असता, त्यांना आपल्या घरात चोरी झाल्याचे कळाले. त्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर रसाळ यांच्या घरातही चोरी झाल्याचे समजले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिवानंद देवकर, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वारे, नसिर सय्यद, योगेश दाभाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, उपविभागीय अधिकारी सी. डी. शेवगण यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर श्वान पथक तसेच मोबाईल लोकेशन पथक पाचारण झाले.नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणमागील काही दिवसांपासून परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, महाकाळा, भगवाननगर, चुर्मापुरी व परिसरात रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.दरम्यान, या परिसरात मागील काही महिन्यांपासून १५ ते २० चो-या झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. यातील काही चोºया उघडकीस आल्या असून, काही चोऱ्यांचे तपास अद्यापही पोलिसांना लागले नाही. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
चुर्मापुरीत चोरट्यांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 12:43 AM