...तर ओबीसी आरक्षण ३२ टक्के कसे? मनोज जरांगे पाटील, अजित पवारांच्या भूमिकेवर आक्रमक भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 06:18 AM2023-10-24T06:18:20+5:302023-10-24T06:18:54+5:30
तुम्हाला करायचे काय, नेमके हेच आम्हाला कळेना? आमची पार राख रांगोळी करायची का? मनोज जरांगे यांचा सवाल
लोकमत न्यूज नेटवर्क, अंतरवाली सराटी (जि. जालना) : बाठीया आयोगाच्या सर्वेक्षणानुसार ओबीसींची लोकसंख्या ३७ टक्के असेल तर मग आरक्षण ३२ टक्के कसे? असा सवाल करीत मराठा समाजातील युवकांनी आजवर तुमचे शब्द ऐकले म्हणून त्यांची ही दशा झाली. किती समजूतदारपणा घ्यायचा आणखी? तुम्हाला करायचे काय नेमके मराठा समाजाचे हेच आम्हाला कळेना? असा सवाल करीत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनाेज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भूमिकेवर आक्रमक भूमिका स्पष्ट केली.
कुठल्याही समाजाला न दुखविता मराठा आरक्षण देण्यासाठी प्रयत्न आहे. ओबीसीला धक्का न लावता आरक्षण दिले जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. याचा जरांगे पाटील यांनी सोमवारी चांगलाच समाचार घेतला. तुम्हाला करायचे काय, नेमके हेच आम्हाला कळेना? आमची पार राख रांगोळी करायची का? असा सवाल दोन दिवसांत आरक्षण द्यावे. शासनाला एक तासही वेळ देणार नाही, असे जरांगे यांनी स्पष्ट केले.
सारथी संस्थेत कुणबी कसे?
मराठा आणि कुणबी एक नाहीत असे कोणी म्हणूच शकत नाही. दोघेही एकच आहेत म्हणूनच शासनाने सारथी संस्थेमध्ये घेतलेले आहे. शासनाजवळ तिथेच उत्तर आहे. आता समितीला कागदं गोळा करायला लावू नका, असेही ते म्हणाले.
आपण चौंडीला जाणार
आपण अहिल्यादेवी होळकर यांच्या दर्शनासाठी चौंडीला जाणार आहोत. धनगर बांधवांचा आम्हाला पाठिंबा आहे.