शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
4
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
5
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
6
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
9
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
10
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
11
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
12
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
13
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
14
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
15
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
16
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
17
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
18
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
19
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
20
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला

किल्ल्यावरून उतरताना वाहनांवर अचानक टेम्पो आला कसा? जरांगे यांची धक्कादायक माहिती

By विजय मुंडे  | Published: February 10, 2024 5:54 PM

असे विविध सात प्रकार आमच्यासोबत घडल्याची धक्कादायक माहिती मनोज जरांगे पाटील यांनी आज दिली.

जालना : साल्हेर किल्ल्यावरून दर्शन घेताना पाेलिस गडबड करीत होते. त्यामुळे खाली काही तरी गडबड असल्याचा संशय आला. खाली येताना अचानक टेम्पो वाहनांवर आला. त्यावेळी एकजण ओरडल्याने लोकं बाजूला झाली आणि दुर्घटना टळली. त्याला पोलिसांनी धरले. त्याने कोणाचेतरी नाव घेतले मला पिकअप घालायला सांगितल्याचे पोलिसांना सांगितले आहे. त्याची चौकशी करण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींना सांगितले आहे. असे विविध सात प्रकार आमच्यासोबत घडल्याची धक्कादायक माहिती मनोज जरांगे पाटील यांनी आज दिली. जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आजपासून अंतरवाली येथे पुन्हा उपोषण सुरू केले आहे.

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी १० फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. ओबीसी आरक्षण ज्या कायद्यानुसार दिले त्या कायद्यात दुरूस्ती करून सग्यासोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करणे, ज्या लग्नाच्या सोयरीकी जुळतात त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व सोयऱ्यांना नोंदीच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र द्यावे, शिंदे समितीचे काम युद्धपातळीवर वाढवावे, एक वर्षाची मुदतवाढ द्यावी, मागासवर्गीय आयोगाचा अहवाल स्वीकारून कायदा पारित करावा आदी मागण्यांसाठी आपण हे आमरण उपोषण सुरू केले आहे, असे जरांगे म्हणाले.

त्यांनीच पत्र द्यायला सांगितले असेलमंत्री छगन भुजबळ यांना धमकीचे पत्र आल्याबाबत विचारले असता जरांगे पाटील म्हणाले, त्यांना कोणी धमकी देणार नाही. त्यांनीच कोणाला तरी पत्र द्यायला सांगितले असेल. त्यांच्या नेत्यांनी त्याला बळ दिल्यामुळे माझ्या जातीला त्रास होतोय. त्याला थांबविण्याचा विचार करा. जे आडमुठे आहेत, जे कोयत्याची भाषा करतात, जातींमध्ये भांडणे लावतात त्यांना पोलिसांचे संरक्षण आहे, त्यांच्यासाठी सरकार असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला.

तर मंडल आयोगाला चॅलेंज करणारत्यांनी गोरगरिब ओबीसींसाठी भूमिका बदलावी. पडद्याच्या मागे राहून लेकरांचे वाटुळे केले तर मी मंडल आयोगाला चॅलेंज करणार. गोरगरिबांचे वाटोळे करण्याची नियत नाही. परंतु, लेकरांचे मुडदे पडायला लागले तर आपल्याला मंडल आयोगाला चॅलेंज करावे लागणार असल्याचा पुर्नरूच्चारही जरांगे पाटील यांनी केला.

गृहविभागाचे नवीन नियमजे शांततेचे आवाहन करतात, कायद्याची मागणी प्रमाणिकपणे करते त्यासाठी सरकार नाही. जे आडमुठी मागणी करेल, जातीत तेढ निर्माण करेल, ओबीसी- मराठ्यात वाद लावतात त्यांच्यासाठी सरकार आहे. गृहविभागाचे नवीन नियम आलेत गुन्हे कोणाचे मागे घ्यायचे त्यांच्याकडे येणाऱ्यांचे, त्यांचे ऐकाऱ्यांचे, बाकीच्यांवर गुन्हे टाकायचे. घोटाळे करणाऱ्यांना सोबत घेवून फिरायचे असे नवीन नियम निघाल्याची टिकाही जरांगे पाटील यांनी केली.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलJalanaजालना