लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेच्या शुभारंभासाठी सिने अभिनेता अरबाज खानची एंट्री कुस्तीच्या मैदानात होताच उपस्थित प्रेक्षकांनी खास करून युवकांनी त्याचे जल्लोषात आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. त्याने देखील प्रेक्षकांना हात उंचावून अभीवादन केले. अरबाज खान येणार म्हणून यापूर्वीच जाहीर करण्यात आल्याने आझाद मैदान गर्दीने फुलून गेले होते.गुरूवारी सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास अरबाज खानची एंट्री झाली. कॅमेऱ्याने त्यांची एंट्री टिपताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला.महाराष्ट्र केसरी कुस्तीस्पर्धेचा औपचारीक शुभारंभ हा खºया अर्थाने बुधवारीच झाला होता. गुरूवारी सायंकाळी अधिकृतरित्या शुभारंभ करण्यात आला. प्रारंभी संयोजकांनी या शुभारंभाच्या सोहळ्यास प्रसिध्द अभिनेता संजय दत्त येणार म्हणूनही जाहीर केले होते. मात्र ऐनवेळी संजय दत्तने निर्णय बदलला. परंतु अरबाज खान येणार हे पूर्वीपासूनच निश्चित होते. आणि त्यांनी दिलेला शब्द पाळला. विशेष म्हणजे आरबाज खानच्या लहानभावाचा वाढदिवस असतानाही आपण येथे आपले मित्र राज्यमंत्री अर्जुन खोतकरांना जो शब्द दिला होता. तो पाळ्याचे आरबाज खानने सांगितले.आरबाज खानने एंट्री केल्यावर त्यांच्या हस्ते आखाड्यातील बजरंगबलीची पूजा आणि नारळ त्यांच्या हस्ते फोडण्यात आला. विमानाने पुन्हा मुंबई गाठायची असल्याने संयोजकांनी त्याला प्रथम बोलण्याची संधी दिली. यावेळी त्याने त्याच्या खास शैलितील हिंदीने सर्वांना मंत्रमुग्ध केले.प्रारंभी मराठीतून त्याने कस...काय...जालनेकर असे विचारल्यावर सर्वांनी बरे आहे...असे उत्तर देत प्रतिसाद दिला, आज माझ्या मागे घरगुती कार्यक्रम असल्याने मै जल्दी मे हुँ. अगेल बार इन्शाल्ला.. मै फिर जरूर जालना आऊंगा असे सांगून त्यांने येथे बोलावून जो सत्कार केला त्याने आपण भारावून गेल्याचे सांगितले.अन् लगेचच आरबाज खानने निरोप घेतला. यावेळी त्याला पाहण्यासाठी युवकांनी त्याच्या गाडीजवळ मोठा गराडा घातलाहोता.आझाद मैदनावर या कुस्तीचा रंगारंग उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी विधानपभेचेअध्यक्ष हरिभाऊ बागडे, पालकमंत्री बबनराव लोणीकर, गृहराज्य मंत्री दिपक केसरकर, राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आ. राजेश टोपे, आ . संदीपान भुमरे, कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे, शेष महाराज गोदंीकर, भगवान महाराज आनंदगडकर माजी आ. कैलास गोरंट्याल, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, संतोष सांबरे, शिवाजी चोथे, लक्ष्मण वडले, अॅड. ब्रम्हानंद चव्हाण, रमेशचंद्र तवरवाला, किक्रेटपटू विजय झोल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द खोतकर, उपाध्यक्ष सतीश टोपे, प्रा. दयानंद भक्त, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे. बोराडे, विष्णू पाचफुले आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेचे स्वागताध्यक्ष राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सर्वांचे स्वागतकेले.गुरूवारी सकाळी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी आलेल्या प्रमुख पहिलवानांची वाजतगाजत शहरातून मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक आझाद मैदान येथून प्रारंभ झाली.मिरवणुकीस हिरवी झेंडी स्वागताध्यक्ष राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दाखविली. यावेळी ढोल-तांशाच्या गजरात शहरातील प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक काढ्यात आली.बजरंग बली की जय.. च्या जय घोषणाने संपूर्ण शहर दुमदूमून गेले होते. मिरवणूकीचे शहरातील विविध भागात जंगी स्वागत करण्यात आले.कुस्ती प्रेमीनीस्टेडियम खचाखचजालन्यातील आझाद मैदानावर सुरू असलेल्या कुस्त्या पाहण्यासाठी पंचक्रकोशीतून तसेच अन्य जिल्ह्यातून कुस्ती प्रेमींनी मोठी गर्दी केली आहे. संपूर्ण आझाद मैदान गर्दीने फुलून गेले होते.संयोजकांनी सहा मोठे स्क्रीन बसवल्याने कुस्तीतील डावपेच हे प्रेक्षकांना अत्यंत जवळून अनुभवण्यास मिळत होते. गादी आणि माती गटातील कुस्त्यांमध्ये अत्यंत चित्तथरारक आणि हदयाचे ठोके थांबविणारे अनेक प्रसंग उपस्थितांनी आपल्या मोबाईलच्या कॅमे-यात टिपतांना दिसून येत होते. गर्दी नियंत्रणासाठी पोलीसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.
कसं... काय... जालनेकर...?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 12:55 AM