लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : आष्टी रेल्वे गेट मध्येच वाहने खोळंबल्याने स्थानकात येणारी मनमाड ते काचीगुडा पॅसेजर गाडीला रेल्वेलाही सिग्नलच्या बाहेरच ‘हॉर्न’ वाजवत उभे राहावे लागले. या ठिकाणी पोलिसही नसल्याने अधिकच गोंधळ उडाला होता.परतूर आष्टी रस्त्यावरील रेल्वे गेट वर उड्डाण पुलाचे काम संथ गतीने सुरू आहे. यामुळे या मार्गावरील वाहतुकीचे काहीच केलेले नाही. संबंधित गुत्तेदाराने ठिकठिकाणी खोदकाम करून ठेवले आहे. यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे.रविवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारा औरंगाबादकडून येणाऱ्या मनमाड ते काचीगुडा पॅसेंजर रेल्वेगाडीमुळे रेल्वे फाटक लागले. यामुळे चारही बाजूने वाहने खोळंबली. ही वाहने काढण्यात बराच विलंब झाला. यातच पुन्हा दुसरी पॅसेंजर गाडी औरंगाबाद वरुन आली. मात्र ही खोळंबलेली वाहने रेल्वेगेट मध्येच खोळंबली. यामुळे रेल्वे गेटही लावता येईना, रेल्वे मात्र सिग्नलच्या बाहेर येऊन उभी राहिली. ही रेल्वे अर्धा तास ‘हॉर्न’ वाजवत उभी राहिली. इकडेही वाहतुकीचा गोंधळ वाढतच गेला. एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहतूक खोळंबल्यानंतरही या ठिकाणी वाहतूक पोलीस नसल्याने वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहना करावा लागला. रेल्वे सिग्नलच्या बाहेर रखडली व रेल्वे गेटमध्ये वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहने खोळंबली. नंतर गेटमनने त्याचेही हॉर्न सारखे वाजवत मध्येच गेट बंद केले व रेल्वेला मार्ग मोकळा करून दिला. अशी कोंडी दिवसातून दोन ते तीन वेळा हात आहे, असे वाहनधारकांचे म्हणणे आहे. यामुळे मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.गुत्तेदाराचे दुर्लक्ष, कामावर अभियंता नाहीया रेल्वे गेटवर उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. चारही बाजूने खोदकाम करण्यात आले आहे. मात्र वाहतुकीचा कुठलाच विचार करण्यात आला नाही. आष्टीकडे जाणारा रस्ता एकेरी झाल्याने वाहने खोळंबत आहेत. ठेकेदाराने पर्यायी रस्ता किंवा दोन्ही बाजूंनी रस्ता सुरू न ठेवल्याने या रेल्वे गेटवर गोंधळ उडत आहे.कामावर जबाबदार अभियंताही नाही व वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीसही नाहीत. यामुळे मोठा गोंधळ होत आहे. तरी मोठा अनर्थ घडण्याअगोदर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करून या ठिक ाणी नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.
परतुरात रेल्वेगेटवर वाहने खोळंबल्याने गोंधळ, रेल्वेही सिग्नलबाहेर रखडली...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 12:46 AM