लोकमत न्यूज नेटवर्कजालना : भारतातील अग्रगण्य संस्था म्हणून परिचित असलेल्या आयसीटी इन्स्टिट्यूट आॅफ केमिकलचा पाहिला ट्रायसेमिस्टर पूर्ण झाला आहे. आयसीटीत चार वर्षे पूर्ण झाल्यावर एम.टेक ही पदवी देण्यात येते. गेल्या वर्षी मे महिन्यात आयसीटीच्या अभ्यासक्रमाला प्रत्यक्ष प्रारंभ झाला होता. यात चार महिने थेअरी तसेच दोन महिने संबंधित उद्योगात प्रत्यक्ष काम असे स्वरूप आहे.जालन्यात आयसीटीच्या प्रोफेसर डॉ. स्मिता लेले या काम पाहत आहेत, या संदर्भात त्यांच्याशी संपर्क केला असता, त्या म्हणाल्या की, आयसीटी अंतर्गत जालन्यात ६० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यातील ३० विद्यार्थी हे थेअरी तर ३० विद्यार्थी हे प्रत्यक्ष उद्योगात काम करतात. जालन्यातील स्टीलसह अन्य उद्योगात हे विद्यार्थी सहभाग नोंदवत आहेत. सध्या येथे केमिकल इन्स्टिट्यूटमध्ये एमटेकसह लहान अभ्यासक्रमही सुरू आहेत.त्यात फूड, एनर्जी, पेट्रोकेमिकल्स, फार्मा आॅईल, मटेरियल आदी अभ्यासक्रमही सुरू असल्याचे लेले यांनी सांगितले.भविष्यात पाणी तसेच त्यातील घटक हा प्रकल्प घेऊन त्यावर संशोधन करण्याचा विचार असल्याची माहिती लेले यांनी संपर्क साधला असता दिली.२०० एकर जागेत आयसीटीमुंबईतील आयसीटीची महाराष्ट्रातील ही दुसरी शाखा आहे. जालन्यात ही आयसटी सुरू व्हावी पूर्ण मोठे प्रयत्न करण्यात आले. यासाठी जिल्हा प्रशासनाने सिरसवाडी शिवाराजवळ २०० एकर जागा दिली असून, ही जागा आयसीटीने ताब्यात घेतली आहे. या दोनशे एकर जागेला आता पाच कोटी रूपये खर्च करून सुरक्षा भिंत बांधण्यात येणार असल्याचे सांगण्यात अले.
आयसीटीचा ट्रायसेमिस्टर पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 12:09 AM