ज्याला बसायचे त्याने बसावे... डबल इंजिनचा मीच ड्रायव्हर; दानवे गोरंट्याल यांच्यात 'जुंपली'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 03:41 PM2023-06-01T15:41:52+5:302023-06-01T15:43:37+5:30
आज जालन्यात लोकोमोटीव्ह कामाचे दानवे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले.
रावसाहेब दानवेभाजपाचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष असताना खूप प्रसिद्धीच्या झोतात होते. परंतू, जेव्हा ते केंद्रात गेले तेव्हा महाराष्ट्रातील त्यांचा वावर कमी झाला आहे. तरीही अधून मधून दानवे राजकीय वक्तव्ये करून चर्चा घडवून आणत असतात. नुकतेच त्यांनी काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांना इशारावजा टोला लगावला आहे.
आज जालन्यात लोकोमोटीव्ह कामाचे दानवे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. यावेळी काँग्रेसचे स्थानिक आमदार कैलास गोरंट्यालही उपस्थित होते. या कार्यक्रमात दोघांमध्ये टोलेबाजी चांगलीच रंगली होती. सुरुवातीला गोरंट्याल यांनी भाषणात दानवेंना टोलेवजा सोबत घ्या असे संकेत दिले होते. त्यावर दानवे यांनी देखील एकप्रकारे तुम्हीच या असे म्हटले आहे.
दानवे यांनी जालना शहरात चांगला विकास केला. मात्र त्यांनी रेल्वे इंजिनसोबत आमच्यासारखा एक डब्बाही घेऊन फिरावे, असे गोरंट्याल यांनी म्हटले. यावर दानवे यांनी हे डबल इंजिनचं सरकार, ज्याला बसायचं त्याने बसावं, मात्र ड्रायव्हर मी आहे, असे सांगत एकप्रकारे इशाराच दिला आहे.