ल्ोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : संसारात सुख शांती हवी असेल तर यासाठी नामस्मरण करायला हवे, संसारातून आडमार्गी जाणाऱ्या माणसाला मार्गी लावण्याचे काम संत करत असतात. त्यामुळे आपण महापुरुषाचे जन्म आणि दत्तजन्म कशासाठी साजरा करतो, याचे महत्व समजून घेतले पाहिजे, असे प. पूज्य, भास्कर महाराज देशपांडे यांनी सांगितले आहे.येथील नवनाथ संस्थानमध्ये भाविक - भक्तांच्या उपस्थितीत शनिवारी दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.या वेळी पुरुषोत्तम महाराज कुलकर्णी यांचे जन्मकथा या विषयी संगीत किर्तनामधून ब्रह्म, विष्णू, महेश, अंतरीऋषी, माता अनसूया यांची दत्त रुपी महिमा सांगून तीन शिरे सहा हात, तया माझा दंडवत, संत तुकोबाराय यांनी दत्त जन्मानिमित्त घेतलेला अभंग, मंहती सांगून जन्माचे महत्व सांगण्यात आले.प्रारंभी दत्त जन्माची कथा सांगताना माता अनुसया याचे पातिव्रत्य सिद्ध कसे झाले, याची माहिती त्यांनी दिली.दुपारी जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी महिलांनी विधिवत पूजा करून दत्त जन्मोत्सव साजरा केला. रविवारी दत्त जयंती सप्ताहाची सांगता होणार आहे. या निमित्य दुपारी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सुख-शांती हवी असेल तर नामस्मरण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 1:21 AM