या काचबिंदूची अनेक लक्षणे नागरिकांमध्ये अत्यंत कासवगतीने भिनतात. त्यामुळे काचबिंदू कधी झाला हे समजतही नाही. काचबिंदू झाल्यावर तुम्हाला समोरचे स्वच्छ दिसते. परंतु आजूबाजूची दृष्टी कमी होते. तर काहींना ती अंधूक होते. यात दोन प्रकारचे काचबिंदू असतात. त्यात ओपन ॲंगल आणि क्लोज ॲगल यांचा समावेश होतो. हा काचबिंदू तपासण्यासाठी फिल अनायझर मशीनद्वारे तपासला जातो. यात डोळ्यातील पाण्याचे प्रेशर किती आहे, हे कळते. त्याच्या निकषांपेक्षा अधिक किंवा कमी असल्यास हा काचबिंदू होण्याचा धोका अधिक असतो. तो होऊ नये म्हणून डोळ्यांची दर सहा महिन्याला शास्त्रीयदृष्ट्या तपासणी होणे गरजेचे आहे.
चौकट
नियमित काळजी हाच उपाय
काचबिंदू पूर्णपणे बरा होतोच असे नाही. त्यमुळे हा काचबिंदू होऊ नये यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. अन्य आजारांची ज्या पद्धतीने आपण काळजी घतो त्या पद्धतीने डोळ्यांची काळजी घेत नाही. येथेच आपण चुकतो. काचबिंदू झाला म्हणून घाबरून जाण्याचे कारण नसून, त्यावर आज अनेक अत्याधुनिक उपाय आहेत. त्यामुळे नागरिकांनी भीती बाळगण्याची गरज नाही. परंतु सतर्क राहणे हाच यावरील उपाय आहे.
डॉ. उदय नाईक- कार्लेकर, नेत्ररोगज्ज्ञ