लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : शासनाच्या पर्यावरण विभागाने प्लास्टिकच्या वापरावर वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध जारी करण्याचा निर्णय घेतलेला असतांना जाफराबाद शहरात सर्रास प्लास्टिक विक्री आणि नियमबाह्य वापर केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळच्या सुमारास नगर पंचायतीचे मुख्याधिकारी अमित सोंडगे यांच्या पथकाने अचानक छापा टाकून चार दुकानांवर दंडात्मक कारवाई केली आहे.प्लास्टिक बंदीचा निर्णय घेण्यात येऊन जवळपास एक वर्ष होत आहे. मात्र, व्यावहारिक पातळीवर या निर्णयांची अंमलबजावणी शक्य झाली नसल्याने, अवैधपणे प्लास्टिक विक्री आणि दुकानदार दुकानातून साहित्य देण्यासाठी याचा वापर करत आहे. ग्राहकसुद्धा प्लास्टिकची पिशवी मागणी करताना दिसत आहेत. प्लास्टिक पिशवी व्यतिरिक्त शासनाकडून त्यासाठी कोणताही पर्याय उपलब्ध करून न देण्यात आल्यामुळे प्लास्टिक बंदीच्या आदेशाचा बोजवारा उडाला आहे.ही कारवाई प्लास्टिक बंदी कायद्याअंतर्गत करण्यात केली आहे. या चार दुकानदारांकडे लग्नकार्यासाठी लागणारे प्लास्टिक ग्लास, कॅरिबॅग, पत्रावळी आढळून आल्या असून, त्यांना पाच हजार रूपयांचा प्रत्येकी दंड आकारण्यात आला आहे.
अवैध प्लास्टिक विक्री; ४ दुकानदारांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 12:20 AM