लोकमत न्यूज नेटवर्ककुंभार पिंपळगाव : गोदावरी नदीपात्रात शिवणगाव परिसरात अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून अचानक टाकलेल्या धाडीत एक ट्रॅक्टरसह सुमारे तीन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला.यामध्ये वाळू उत्खनन करणाऱ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दोन केन्या व इंजिनसह इतर साहित्य जप्त केले. या कारवाईत एकूण १ लाख २० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर कुंभार पिंपळगाव ते शिवणगाव रत्यावर नागोबाची वाडी फाट्यााजवळ अवैध वाळूच्या साठ्याने भरलेल्या दोन ट्रॉल्यांसह एक ट्रॅक्टर पकडून कारवाई करण्यात आली. असे एकूण सुमारे तीन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आलागोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याने सोमवारी सायंकाळी ७ वाजता अचानकपणे धाड टाकून दोन ठिकाणी चालू असलेल्या अवैध वाळूचे उत्खननसाहित्य जप्त केले. मंगळवारी दुपारी हे साहित्य महसूल प्रशासनाकडे जमा करण्यात आले.ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सी. डी. शेवगण व तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड व कुंभार पिंपळगाव चौकीचे पोलिस उपनिरीक्षक भागवत नागरगोजे व महसूल प्रशासन यांच्या पथकाने संयुक्तरीत्या केली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक भागवत नागरगोजे, पोलीस जमादार संजय राऊत, संदीप पाटील, राम घुले, रंजित कटावकर, केंद्रे, कुंटे तसेच महसूल विभागाचे मंडळ अधिकारी रखमाजी घनवट, तलाठी कैलास घारे, एस चौरे, ठाकरे, तलाठी शेख यांचा समावेश होता. कुंभार पिंपळगाव ते शिवणगाव दरम्यान पेट्रोलिंग करताना अवैध वाळू वाहतूक करणारे अन्य वाहनांवरही कारवाई करण्यात आली.जप्त वाळूसाठ्याची चोरीमागील वर्षी आॅगस्ट महिन्यात भादली येथे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या कारवाईत ८३०० ब्रास वाळूचा साठा जप्त करण्यात आला होता मात्र अद्यापही त्या अवैध वाळूच्या साठ्याचा लिलाव करून विल्हेवाट लावण्यात आली नसल्याने त्या जप्त साठ्यातून वाळू चोरीला जात आहे. याबाबत महसूल प्रशासनाने ठोस निर्णय घेऊन या जप्त साठ्याची विल्हेवाट लावण्याची मागणी होत आहे.
अवैध वाळू उत्खनन; ट्रॅक्टरसह तीन लाखांचा ऐवज जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 12:52 AM