लोकमत न्यूज नेटवर्कशहागड : अंबड तालुक्यातील पाथरवाला बु. येथील गोदावरी नदीच्या पात्रातून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन जेसीबी यंत्राच्या साह्याने टॅक्टर भरून दिले जात असल्याची माहिती खबऱ्याने एडीएस पथकास दिली होती.या माहितीनुसार एडीएस पथक प्रमुख धनाजी कावळे, आडे, एपीआय अनिल परजने, पो.कॉ.महेश तोटे, अमर पोहार, बाबा डमाळे यांच्या पोलीस पथकाने पाथरवाला बु. येथील गोदावरी नदीच्या पात्रात छापा टाकला असता जेसीबी यंत्राच्या साह्याने टॅक्टरमध्ये अवैध वाळू भरत असताना अढळून आले. जेसीबी (एम.एच.२१.बीएफ. ३४८९), ट्रॅक्टर (एम.एच.२१.एडी. ३५५८) विना नंबरचा एक ट्रॅक्टर असे जप्त करून गोंदी पोलीस ठाण्यात लावून एकूण ४० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. एडीएस प्रमुख धनाजी कावळे यांच्या फिर्यार्दीवरून जेसीबी चालक-मालक अशोक अर्जुन पौळ, दत्ता प्रल्हाद जºहाड, गणेश निवृत्ती जाधव गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध वाळू तस्करी; ४० लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:45 AM