शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

शहागड येथे टॅक्टरवर बाईकचा क्रमांक टाकून अवैध वाळू वाहतुकीसाठी वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2017 12:36 PM

अवैध वाळू वाहतूक करणा-या टॅक्टरवरील क्रमांक संशयास्पद वाटल्याने तहसीलदार दत्ता भारस्कर यांनी शहनिशा करण्यासाठी टॅक्टरवरील नंबरची मोबाईल अॅपवर पडताळणी केली असता हा क्रमांक बाईकचा असल्याचे उघडकीस आले. 

ठळक मुद्देतहसीलदार दत्ता भारस्कर यांनी  रविवारी मध्यरात्री दिड वाजता  गोरी-गंधारी शिवारात अवैध वाळू तस्करीवर कारवाई केली. यावेळी वाळूची अवैध वाहतूक करणारा टॅक्टर (क्र. एमएच. 21. एझेड. 3764) पकडून पुढील कार्यवाहीसाठी  शहागड पोलीस चौकीत आणला. पुढील कारवाईसाठी चालक मालकाचा शोध घेतेवेळी टॅक्टरवरील नंबर संशयास्पद वाटला

जालना : शहागडसह परिसरात अवैध वाळू तस्करांविरूध्द महसूल विभागाने दंड थोपाटल्याचे पथकाने केलेल्या कारवाईत दिसून येत आहे. दरम्यान, अवैध वाळू वाहतूक करणा-या टॅक्टरवरील क्रमांक संशयास्पद वाटल्याने तहसीलदार दत्ता भारस्कर यांनी शहनिशा करण्यासाठी टॅक्टरवरील नंबरची मोबाईल अॅपवर पडताळणी केली असता हा क्रमांक बाईकचा असल्याचे उघडकीस आले. 

आपेगाव, गोंदी, कोठाळा  (ता.अंबड ) या भागातील अवैध वाळू तस्करांविरूध्द महसूच्या पथकाने दंड थोपटून कारवाईचा बडगा उगारला असल्याचे दिसून येते आहे. या आठ दिवसांत तहसीलदार दत्ता भारस्कर, मंडळ अधिकारी कृष्णा एडके व महसूलच्या पथकाने पाच-सहा अवैध वाळू तस्करी करणारे टॅक्टर जप्त करून शहागड पोलीस चौकीत लावले आहेत.विशेष म्हणजे हे सर्व टॅक्टर नवीन आहेत. काहींच्या ट्राल्या नवीन आहेत. टॅक्टर वर नंबर प्लेट नाही. एखाद्यावर नंबर प्लेट आहे तर त्या समजू नये अशा करून ठेवल्या आहेत. 

तहसिलदारांनी केली मध्यरात्री कारवाईतहसीलदार दत्ता भारस्कर यांनी  रविवारी मध्यरात्री दिड वाजता  गोरी-गंधारी शिवारात अवैध वाळू तस्करीवर कारवाई केली.  यावेळी वाळूची अवैध वाहतूक करणारा टॅक्टर (क्र. एमएच. 21. एझेड. 3764) पकडून पुढील कार्यवाहीसाठी  शहागड पोलीस चौकीत आणला. पुढील कारवाईसाठी चालक मालकाचा शोध घेतेवेळी टॅक्टरवरील नंबर संशयास्पद वाटल्याने. तहसीलदार दत्ता भारस्कर यांनी सहनिशा करण्यासाठी टॅक्टर वरील नंबर मोबाईल अॅपवर पडताळून पाहिला असता तो नंबर दुचाकीचा असल्याचे आढळून आला. 

आरटीओ विभागाचे सपशेल दुर्लक्षया प्रकाराकडे आरटीओ विभागाचे सपशेल दुर्लक्ष केले आहे. कित्येक वर्षापासून शहागडसह परिसरात एकही टॅक्टर वर कारवाई करण्यात आलेली नाही. सध्या शहागड पोलीस चौकीत पाच अवैध वाळू तस्करी करणारे टॅक्टर जप्त करून शहागड पोलीस चौकीत लावण्यात आलेले आहेत. यातील सर्व टॅक्टरचे क्रमांक संशयास्पद आहेत. यामुळे आता शहागडसह परिसरातील विना नंबर व विना पासिंगचे फिरणा-या टॅक्टरवर आरटीओ कोणती कारवाई करते का याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. 

आरटीओ कार्यालयाला कळवले आहेअवैध वाळू तस्करी करणारे टॅक्टर जप्त करून शहागड पोलीस चौकीत लावले आहे, त्याचा नंबर संशयास्पद वाटल्यास मोबाईल अॅपवर डाऊनलोड केला असता तो टॅक्टर वरचा नंबर मोटारसायकलचा असल्याचे आढळून आले आहे. आपण याबाबत आरटीओ ऑफिस जालना ला पत्राद्वारे कळवणार असल्याचे तहसीलदार दत्ता भारस्कर यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.