जालना : अवैधरीत्या शस्त्र बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी पकडले. बलजितसिंग इंदलसिंग टाक (रा. गुरुगोविंदसिंगनगर, जालना), यश ऊर्फ जयेश संजय फतेलष्करी ऊर्फ यादव (रा. कालीकुर्ती, जालना), विशाल किसनसिंग राजपूत (रा. लोधी मोहल्ला, जालना) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून तीन तलवारी, दोन कोयते असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
जालना शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिले होते. त्यानुसार गुन्हेगारांची माहिती काढत असताना, बलजितसिंग टाक, यश यादव आणि विशाल राजपूत यांच्याकडे अवैध शस्त्रसाठा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांना मिळाली. या माहितीवरून पथकाने त्यांचा शोध घेतला. त्यांच्याकडून तीन तलवारी, दोन कोयते जप्त करण्यात आले आहे.
त्यांच्याविरुद्ध वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलिस अधीक्षक राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ, पोहेकॉ. सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, प्रशांत लोखंडे, फुलचंद गव्हाणे, सुधीर वाघमारे, कैलास चेके, योगेश सहाने, धीरज भोसले, सौरव मुळे यांनी केली आहे.