कचरा उचलण्याची मागणी
जालना : शहरांतर्गत विविध भागांतील नाल्या तुंबल्या असून, कचराही साचला आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ही बाब पाहता संबंधितांनी लक्ष देऊन स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.
प्रवाशांची गैरसोय
बदनापूर : संचारबंदीमुळे जिल्हांतर्गत व जिल्हाबाह्य लांब पल्ल्याच्या बस बंद आहेत. त्यामुळे शहरी, ग्रामीण भागात प्रवास करू इच्छिणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी बससेवा सुरू करावी, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.
धुळीमुळे व्यापारी त्रस्त
भोकरदन : शहरांतर्गत प्रमुख मार्गांवर मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. या धुळीमुळे दुकानांतील साहित्य खराब होत आहे. शिवाय अनेक व्यापाऱ्यांना श्वसनाचे आजार जडू लागले आहेत. ही बाब पाहता पालिकेने शहरांतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
अवैध गुटखा विक्री
परतूर : शहरासह ग्रामीण भागात अवैध गुटखा विक्री जोमात सुरू आहे. शासनाने घातलेली बंदी आणि लागू असलेली संचारबंदी या काळातही गुटख्याची अवैध वाहतूक व विक्री सुरू आहे. याकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन कारवाई मोहीम राबविण्याची गरज आहे.
वाहनचालकांची कसरत
बदनापूर : तालुक्याचे ठिकाण असलेल्या बदनापूर शहराला जोडणाऱ्या रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. खराब रस्त्यांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. ही बाब पाहता संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.