शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

मन्याड धरणाची उंची वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 9:30 PM

चाळीसगाव तालुक्यातील २२ खेड्यांसाठी वरदान ठरलेल्या मन्याड धरणाची उंची दोन मीटरने वाढवावी यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

ठळक मुद्देशेतकरी आंदोलनाच्या तयारीततालुक्यातील २२ खेड्यांसाठी वरदान

चाळीसगाव, जि.जळगाव : तालुक्यातील २२ खेड्यांसाठी वरदान ठरलेल्या मन्याड धरणाची उंची दोन मीटरने वाढवावी यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. जि.प.चे माजी सदस्य किशोर माधवराव पाटील यांनी शनिवारी पत्रपरिषदेत ही माहिती दिली. ५ आॅगस्टपासून आंदोलनाला सुरुवात होणार असून, तहसील कार्यालय परिसरात उपोषण केले जाणार आहे. यावेळी जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील यांच्यासह २२ खेड्यातील प्रमुख शेतकरी उपस्थित होते.१९७२ मध्ये मन्याड धरण उभारले गेले. या धरणावर तालुक्यातील २२ खेड्यांच्या सिंचनासह पिण्याच्या पाण्याच्या योजनांचा समावेश आहे. १९०५ दशलक्षघनफूट क्षमता असलेले मन्याड अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने यंदाही कोरडेठाक आहे. निम्मा पावसाळा संपत आला तरी मन्याडमध्ये अद्यापही पाणी आलेले नाही. परिणामी धरण क्षेत्रातील २२ खेड्यांवर दुष्काळाचे सावट आहे.किशोर पाटील यांनी परिसरातील २२ खेड्यांचा दौरा करून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. २२ ग्रामपंचायतीचे ठराव घेऊन मन्याडची उंची वाढविण्याच्या आंदोलनाचा बिगूल वाजविला आहे.गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने मन्याड परिसरात तीव्र दुष्काळ आहे. शेती क्षेत्राला याचा मोठा फटका बसला आहे. चारा-पाणी नसल्याने गुरांचेही हाल होत आहे. मन्याड सोबतच नारपार योजनादेखील पूर्ण करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.पत्रपरिषदेला बाजार समितीचे उपसभापती महेंद्र पाटील, संचालक कल्याण पाटील, प्रकाश पाटील, पं.स.चे राष्ट्रवादीचे गटनेते अजय पाटील, विलास पाटील, दीपक पाटील, अरुण नागरे, छगन जाधव, नीलेश पाटील, धनंजय पाटील, हेमराज पाटील आदी उपस्थित होते. उपोषणाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारादेखील देण्यात आला आहे. निवेदनाची प्रत मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री व संबंधित विभागांना पाठविण्यात आली आहे.

टॅग्स :DamधरणChalisgaonचाळीसगाव