सेामवारी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी रेमडेसिविरचा मोठा दिलासादायक साठा जालन्यासाठी उपलब्ध करून घेण्यासाठी या इंजेक्शनच्या निर्मिती करणाऱ्या कंपन्यांशी संवाद साधून उपलब्ध करून घेतला आहे. त्यामुळे हा साठा साधारणपणे मंगळवारी रात्री अथवा बुधवारी दुपारपर्यंत जालन्यात पोहोचेल असे सांगण्यात आले.
मंगळवारी खासगी आणि शासकीय रुग्णालयातून या इंजेक्शनला माेठी मागणी आहे. ही बाब लक्षात घेऊन जालन्यातील स्टॉकिस्ट आणि अन्य वितरकांची नोेंद ठेवण्यात येणार असून, कुठल्या वितरकास किती इंजेक्शन दिले यावर लक्ष राहणार आहे. तसेच ते देताना डॉक्टरच्या प्रिसक्रिप्शनची नितांत गरज राहणार आहे. तसेच त्याची नोंद ठेवण्यात येणार असून, यात काही काळेबेरे करण्याचा प्रयत्न झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींनुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
चौकट
किंमतीवरही राहणार लक्ष
एकीकडे या रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी वाढल्याने ते मिळविताना नाकीनऊ येत आहेत. हे इंजेक्शन वेगवेगळ्या कंपनीचे राहणार आहे. त्यामुळे ते शासनाने दिलेल्या दरात म्हणजेच एक हजार ४०० रुपयांना मिळावे अशी आशा आहे. परंतु काही वितरकांनी किमान वाहतूक तसेच वितरणाचा खर्च निघावा म्हणून जास्तीत हे इंजेक्शन एक हजार ६०० ते एक हजार ८०० रुपयांना विक्री होऊ शकते असे सांगण्यात आले.