शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live:रतन टाटांची अंत्ययात्रा ४ वाजता; वरळी येथील स्मशानभूमीत पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार
2
Ratan Tata : रतन टाटांना मरणोत्तर 'भारतरत्न' मिळणार? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर
3
टाटा, गोदरेज, भाभा! इराण या बड्या हस्तींना मुकला...; पारशी समाज भारतात आलाच नसता तर... 
4
काँग्रेसला धक्का! ५ टर्म खासदार राहिलेल्या काँग्रेस नेत्याचा मुलगा मनसेत प्रवेश करणार
5
"माझा क्रिकेटशी काहीही संबंध नाही"; असं का म्हणाले होते Ratan Tata?
6
अमेरिकेनं इस्रायलला एक वर्षात दिले 18,47,15,19,00,000 रुपयांचे शस्त्रास्त्र! लिस्ट बघून धक्का बसेल, डोकं गरगरेल
7
PAK vs ENG : WHAT A MATCH! सपाट खेळपट्टीवर पाकिस्तान 'भुईसपाट', इंग्लंडकडून बेक्कार धुलाई
8
"केवळ जिवंत असतानाच नव्हे, तर मत्यूनंतरही..."; सचिन तेंडुलकरची टाटांना भावपूर्ण आदरांजली
9
महायुतीत कुरघोडी! शिंदे गटाच्या आमदाराचं थेट छगन भुजबळांना चॅलेंज; समोर या, मग...
10
लाईव्ह शोमध्ये रतन टाटांच्या निधनाची बातमी कळताच दिलजीतच्या 'या' कृतीचं होतंय नेटकऱ्यांकडून कौतुक
11
Kareena Kapoor : "पुरुषांचं वर्चस्व असलेल्या इंडस्ट्रीत टिकून राहणं कठीण"; करीना कपूरने सांगितला अनुभव
12
चाहत्यांच्या गर्दीत सूरज चव्हाणची तब्येत बिघडली; अंकिता म्हणते, 'त्याला सांभाळायची गरज...'
13
रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला केंद्रातून अमित शाह येणार; पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावर
14
रतन टाटांच्या निधनानंतर काय आहे आज कंपनीच्या शेअर्सची स्थिती, किती झाली वाढ किंवा घसरण?
15
Ratan Tata : आजारी कर्मचाऱ्याला पाहायला पुण्याच्या घरी गेले होते रतन टाटा; हा किस्सा सांगून जातो त्यांचा मोठेपणा...
16
संजय राऊतांविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल; लाडकी बहीणविषयी केलेलं वक्तव्य पडलं महागात
17
कर्मचाऱ्याचा जीव वाचवण्यासाठी विमान उडवायला तयार झाले होते रतन टाटा, नेमकं काय घडलं होतं? पुण्यातला आहे किस्सा
18
निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत गटबाजी; मुख्यमंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू?
19
Ratan Tata Net Worth: आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेले रतन टाटा; दानच ९००० कोटींवर केलेले...
20
अमिताभ बच्चन यांच्या सिनेमातून रतन टाटांनी घेतली होती बॉलिवूडमध्ये एन्ट्री, पण सिनेमा फ्लॉप ठरला अन्...

जालना जिल्हाधिकारी कार्यालयात भरली चिमुकल्यांची शाळा; शिक्षकांसाठी विद्यार्थी-पालकांचा ठिय्या

By शिवाजी कदम | Published: January 02, 2024 11:39 AM

जिल्ह्यात शिक्षकांच्या सुमारे ६०० जागा रिक्त आहेत. असे असतांना काही शिक्षकांना प्रतिनियुक्ती देऊन मुख्यालयी बोलवण्यात आले आहे.

जालना: शाळेत शिक्षकच उपलब्ध नसल्याने शिक्षण घ्यावे कसे असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. आज सकाळी साडेदहा वाजता भाेकरदन तालुक्यातील विविध जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून येथे शाळा भरवली. जिल्हाधिकारी कार्यालयात असणाऱ्या सभागृहामध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे धडे घेतले. सकाळी सुरू झालेले विद्यार्थ्यांचे आंदोलन सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू होते. अखेर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थी घराकडे मार्गस्थ झाले.

जिल्ह्यात शिक्षकांच्या सुमारे ६०० जागा रिक्त आहेत. असे असतांना काही शिक्षकांना प्रतिनियुक्ती देऊन मुख्यालयी बोलवण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक उपलब्ध नसल्याची ओरड होत आहे. भोकरदन तालुक्यातील सहा गावातील विद्यार्थी आज चक्क जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले.

गुणवत्तेवर परिणामजिल्ह्यात शिक्षकांच्या जागा रिक्त असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेतील गुणवत्तेवर परिणाम होत आहे. भोकरदन तालुक्यात देखील शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने शिक्षक घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. असे असतांना जिल्हा परिषदेने सुमारे चाळीस शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्या करून त्यांना इतर कामे दिलेली आहेत. शिक्षकांना लिपिक,समन्वयक, गट समन्वयक अशा नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत.

सोबत आणला डबाभोकरदन तालुक्यातील विविध शाळांमधील सुमारे साठ विद्यार्थी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. शिक्षक मिळत नाही तोपर्यंत कार्यालया सोडायचे नाही असा पवित्रा या विद्यार्थ्यांनी घेतला होता. सकाळी नाष्टाकरून हे विद्यार्थी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. यानंतर विद्यार्थांनी दुपारी सोबत आणलेल्या डब्यातून जेवण केले. सायंकाळी प्रशासनाकडून विद्यार्थ्यांच्या चहा, पाणी व नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली.

सहा शाळांचे विद्यार्थी कार्यालयातभोकरदन तालुक्यातील सहा गावातील शाळांच्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या मांडला. यात वाघ्रुळ, प्रिंप्री, सावखेडा, कोपर्डी,बरंगळा लोखंडे, बरंगळा साबळे या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात शाळा भरवली.

शाळांवर शिक्षक नाहीत जिल्ह्यात शिक्षकांची टंचाई असतांना जिल्हा परिषदेने काही शिक्षकांना प्रतिनियुक्तीवर मुख्यालयी काम करण्यासाठी नियुक्त केेले आहे. यामुळे ज्या शाळांवर या शिक्षकांची नियुक्ती आहे, येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात विद्यार्थ्यांची शाळा भरवली.- नवनाथ लोखंडे, अध्यक्ष, बळीराजा फाउंडेशन.

टॅग्स :Jalanaजालनाzp schoolजिल्हा परिषद शाळा