लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात तहसिल कार्यालय व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने आयोजित मतदार जागृती अभियान राबविण्यात आले.या प्रसंगी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट इ. यंत्रांवर उपस्थितांकडून मतदानाचे प्रात्यक्षिक करून घेण्यात आले.या यंत्रांव्दारे केलेले मतदान कोणत्या चिन्हावर केले आहे ते मतदारांना व्हीव्हीपॅट या यंत्रावर दिसते तसेच मतदानाची चिठ्ठी त्या यंत्रात कशी पडते हे दाखवून देण्यात आले. ही यंत्रे कशी सीलबंद करतात, मतदानाची गुप्तता आणि विश्वासार्हता कशी राखली जाते.हे समजून सांगण्यात आले. ही नवीन मतदान प्रक्रिया सुलभ आणि सुरक्षित आहे . मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असेही आवाहन करण्यात आले. महाविद्यालयातील विद्यार्थी व पालक व कर्मचा-यांनी मतदान प्रक्रिया समजून घेतली.या प्रसंगी नायब तहसीलदार दावणगावकर म्हणाले की, भारतीय लोकशाही व्यवस्था ही जगातील सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था आहे. या व्यवस्थेस भक्कम करण्यासाठी सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. प्रशिक्षक उषा गवई , प्रा. औंधकर, प्रधान, ससाणे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. सुधाकर जाधव, डॉ. वैशाली चौधरी, प्रा. राम खालापुरे, उपप्राचार्य रवी प्रधान, एस.एस. मुळे, डॉ. खरात, डॉ. वायाळ, डॉ. टकले, डॉ. नाईकनवरे , प्रा. बिडवे, डॉ. शेलार यांनी प्रयत्न केले.
परतुरात ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रांच्या प्रात्यक्षिकासह मतदार जागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 12:32 AM