लोकमत न्यूज नेटवर्कजालना : घनसावंगी तालुक्यातील येथे गेल्या आठवाडाभरापासून डेंग्यूची लागण झाल्याचा आरोप आहे. या आरोपातील तथ्थ तपासणीसाठी शनिवारी जि. पचे आरोग्य पथक गावात दाखल झाले होते. याच वेळी आ. राजेश टोपे यांनीही वडीरामसगाव येथे भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली.दोन दिवसापूर्वी जि.पच्या स्थायी सभेमध्ये वडीरामसगाव येथील आरोग्याचा मुद्दा चांगलाच गाजला होता. यामध्ये थेट आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांच्यावर दुर्लक्षपणा केल्याचा ठपका सदस्यांनी ठेवला होता. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी केली होती. दरम्यान, शनिवारी आमदार टोपे यांनी तातडीने वडीरामसगाव येथे सर्व वैद्यकीय अधिका-यांचे पथक बोलावून विशेष तपासणी मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या. यावेळी जि.पचे उपाध्यक्ष सतीश टोपे, आरोग्य सभापती रघुनाथ तौर, जि.प. सदस्य जयमंगळ जाधव, सरपंच भास्करवराडे, तालुका आरोग्य अधिकारी रोडे यांच्यासह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.
वडीरामसगाव येथे आरोग्य पथकाकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 12:32 AM