सुकलेले सोयाबीन, कपाशीचे तात्काळ पंचनामे करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 12:28 AM2018-09-17T00:28:00+5:302018-09-17T00:28:44+5:30
पावसाने खंड दिल्याने तोंडाशी आलेले सोयाबीन तसेच मूग आणि उडीदाचे मोठे नुकसान झाले आहे. या सुकलेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. सुरेशकुमार जेथलिया यांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : पावसाने खंड दिल्याने तोंडाशी आलेले सोयाबीन तसेच मूग आणि उडीदाचे मोठे नुकसान झाले आहे. या सुकलेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. सुरेशकुमार जेथलिया यांनी केली आहे.
यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने सर्वच पिक शेतक-यांच्या हातातून जाण्याच्या मार्गावर आहेत. मूग, उडीद हे पिक पावसाअभावी पुरते हातचे गेले आहे. शेतक-यांना अशा होत्या त्या कपाशी व सोयाबीन पिकाकडून मात्र पावसाने पुन्हा उघडीप दिल्याने कपाशी व सोयाबीन सुकत आहे. सध्या कपाशीच्या पिकास पाते, फूल, बोंड लागत आहेत, तर सोयाबीनच्या शेंगा भरत आहेत. मात्र पाऊसच नसल्याने या पिकांनी माना टाकल्या आहेत. त्यामुळे या पिकातूनही शेतक-यांना उत्पन्न मिळण्याच्या आशा मावळल्या आहेत.
शेतकºयांना कर्जमाफिचा लाभही हवा तसा न मिळाल्याने यंदा पुन्हा एकदा दुष्काळाच्या खाईत शेतकरी ढकलला गेला आहे. हमी भावाचा मुद्दा ही मृग जळासारखा आहे. कोणत्याच मालाला हमी भाव मिळत नाही. शासनाने शेतकरी विरोधी धोरण व निसर्गाची अवकृपा यामुळे जिल्हयातील शेतक-यांवर अस्मानी बरोबरच सुलतानी संकट कोसळले आहे. पाउस नसल्याने व शासनाने पाठ फिरवल्याने शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे.