बुधवारी त्यांच्या हस्ते मंमादेवी मंदिर ते रेल्वे स्टेशन या रस्त्याच्या सिमेंटीकरणाच्या कामांस सुरुवात करण्यात आली.
आ. कैलास गोरंट्याल यांनी राज्य शासनाकडून वैशिष्टपूर्ण योजने अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ काही दिवसांपूर्वीच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते व जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे,नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल यांच्या प्रमुख उपस्थितीत केला होता. सदर रस्त्याच्या कामाला नुकतीच सुरुवात करण्यात आली असून, रस्त्याचे काम करताना कुठलीही कुचराई सहन केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. येणाऱ्या कालावधीत वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत राज्य शासनाकडून मंजुरी मिळालेल्या रेल्वे स्टेशन ते पित्ती पेट्रोल पंपापर्यंत या रस्त्याच्या सिमेंटीकरणाचे कामदेखील लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे आ. कैलास गोरंट्याल यांनी सांगितले.
यावेळी नगरसेवक महावीर ढक्का, नगर परिषदेचे अभियंता सय्यद सउद, नगरसेवक विष्णू पाचफुले, नगरसेवक अशोक पवार, नगरसेवक सय्यद आरेफ, अशोक पाटोळे यांची उपस्थिती होती.