सिरसाट यांची निवड
जाफराबाद : तालुक्यातील कुंभारी येथील ॲड. शरद सिरसाट यांची छत्रपती सेना वकील संघ आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांना पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र स्वागत होत आहे.
जयनगर भागात सांडपाणी रस्त्यावर
जालना : शहरातील रेल्वेस्थानक भागातील जयनगर येथील अंतर्गत नाल्या चुकीच्या पध्दतीने करण्यात आल्या आहेत. या नाल्यातील सांडपाणी रस्त्यावर येत असून, यामुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासंदर्भात चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
विद्यार्थिनींना शिलाई मशीन वाटप
भोकरदन : तालुक्यातील जवखेडा खुर्द येथील दशरथबाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात समता फाऊंडेशनच्या वतीने इयत्ता नववी ते बारावी वर्गात शिक्षण घेणाऱ्या व आर्थिक परिस्थिती नाजूक असलेल्या १६ मुलींना मोफत शिवणयंत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आ. संतोष दानवे, निर्मला दानवे, संदीप गावंडे, नंदू कांबळे आदी उपस्थित होते.
खासगाव येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण
जालना : तालुक्यातील खासगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळालेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण जिल्हा परिषद सदस्य संतोष लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डाॅॅ. अजय बोर्डे, उपसरपंच दिनकर कटक, ॲड. सागर लोखंडे, संतोष कोल्हे, संदीप छडीदार, शंकर हिवाळे, विठ्ठल लोखंडे, मनोहर लोखंडे, विजय लोखंडे, पंढरीनाथ लोखंडे आदी उपस्थिती होते.
वृक्षलागवड मोहिमेसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती
जालना : विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार वृक्षलागवड मोहिमेसाठी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी इंगळे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व विभागांचे सर्व अधिकारी कर्मचारी, वृक्षप्रेमी, एनजीओ या सर्वांचाच या मोहिमेत सक्रिय सहभाग राहणार आहे. ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनी या मोहिमेचा शुभारंभ होईल.
तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जागृती
जालना : जिल्हा स्काऊट गाईडच्या वतीने नुकताच तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विरोधी दिन ऑनलाईन पध्दतीने साजरा करण्यात आला. यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम याची माहिती देऊन स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या पोस्टरचे विमोचन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा संस्थेचे सरचिटणीस विनोद चौबे, पवन जोशी, भाग्यश्री प्रभावळे, के. एल. पवार, प्रिया अधाने, विक्रम तिडके आदी उपस्थित होते.
भाजपा वैद्यकीय आघाडीचे निवेदन
जालना : सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न मेडिसिनच्या परीक्षा लवकरात लवकर घ्याव्यात, अशी मागणी भाजपा वैद्यकीय आघाडीच्या वतीने माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली. २०१९मध्ये प्रवेश घेतलेल्या डॉक्टरांची परीक्षा अद्याप झालेली नाही. सदरील परीक्षा २०२०मध्ये होणे अपेक्षित होते. परंतु, अद्याप परीक्षा घेण्यात आली नाही. यावेळी स्वप्नील मंत्री, डॉ. गोविंद भताने हे हजर होते.