संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून समृध्दी महामार्गाचा इंटरचेंज पॉर्इंट (चढ-उतार) मार्ग निश्चित होत नव्हता. परंतु, आता त्या संदर्भातील अध्यादेश जारी झाला आहे. जालना तालुक्यातील निधोना आणि आंबेडकरवाडी येथे हा इंटरचेंज पॉर्इंट होणार आहे.समृध्दी महामार्ग (स्व.बाळासाहेब ठाकरे महामार्ग) हा मार्ग नागपूर ते मुंबई जोडला जाणार आहे तो आठपदरी असून जालन्यात प्रस्तावित असलेल्या ड्रायपोर्टला या मार्गावरुन जड वाहनांना ये-जा करण्यासाठी सोयीचे व्हावे म्हणून इंटरचेंजचा मुद्दा गाजत होता. पूर्वी हा इंटरचेंज जामवाडी तसेच गुंडेवाडी शिवारातून काढण्यासंदर्भात सर्वेक्षण झाले होते. परंतु, यावर अंतिम निर्णय होत नव्हता. यासंदर्भात रस्ते विकास महामंडळ आणि महाराष्ट्र सरकारने ३१ जानेवारी रोजी राजपत्र प्रकाशित केले आहे. त्यानुसार निधोना आणि आंबेडकरवाडी येथे हा इंटरचेंज पॉर्इंट निश्चित केला असल्याचे निर्देशित केले आहे. त्यासंदर्भात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे संपादन केले जाणार आहे. त्यात आंबेडकरवाडी येथील भूमापन गट क्रमांक २६ (२.०२४९), गट क्र. ३९ (२.७४८४), गट क्र्र. ३७ (०.७६७३), गट क्र्र. २३ (९.८९६७), गट क्र्र. १ (०.६५००), गट क्र्र. ९ (९७५५), गट क्र्र. ४७ (०.७७२०), तर निधोना येथील गट क्र्र. ३६ (०.७७३१), गट क्र्र. ३४ (१.०७२५), गट क्र्र. ०२ (०.३०५३), गट क्र्र. २४ (०.४१६६), गट क्र्र. ४० (२.७०१५) आणि गट क्र. ६३ (०.०५९७) असे जमिनीचे हेक्टर नुसार संपादन होणार आहे. यासंदर्भात आक्षेप दाखल करण्यासाठी अध्यादेश जारी झाल्यानंतर २१ दिवसांच्या आता हरकती व सूचना जालना येथील उपविभागीय कार्यालयात दाखल करण्याचे निर्देश आहेत.
निधोना, आंबेडकरवाडीतच ‘इंटरचेंज’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2020 1:05 AM