लोकमत न्यूज नेटवर्कजालना : इयत्ता दहावीचा जालना जिल्ह्याचा निकाल ७६.१४ टक्के लागला आहे. तीन भाषा विषयांना दिल्या जाणाऱ्या अंतर्गत २० गुणांची खैरात बंद केल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत १४ टक्क्यांनी निकाल कमी झाला आहे.जिल्ह्यात १२ हजार ९८ मुले तर ११ हजार ४९४ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यात ५ हजार ७६९ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून, १० हजार २९६ विद्यार्थी प्रथम श्रेणी, ६,५९४ विद्यार्थी द्वितीय तर केवळ उत्तीर्ण होणा-याची संख्या ९३३ एवढी आहे. यामध्ये मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ही ८३.७५ तर मुलांची टक्केवारी ७०.१० एवढी असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
अंतर्गत गुण बंद; टक्का घसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2019 12:12 AM