शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
3
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
4
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
5
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
6
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
7
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
9
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
10
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

अवैध वाळू उत्खनन; ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 1:02 AM

गेवराई तालुका हद्दीत गोरी- गंधारी (ता.अंबड) शिवारातून अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्या ८ वाळू तस्करांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्कशहागड : गेवराई तालुका हद्दीत गोरी- गंधारी (ता.अंबड) शिवारातून अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्या ८ वाळू तस्करांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एकूण ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने बळेगाव ते गोंदी (ता.अंबड) पर्यंतच्या अवैध वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे.उपविभागीय अधिकारी शशिकांत हातगल, गोंदी पोलीस ठाण्याचे सपोनि हनुमंत वारे यांनी बळेगाव ते गोंदी पर्यंतच्या अवैधवाळू तस्करांविरूध्द कारवाईचा सपाटा लावला आहे.अशातच शहागडचे काही अवैध वाळू तस्कर सावरगाव (ता. गेवराई) हद्दीतून व गोरी- गंधारी (ता.अंबड) येथील गोदावरी नदीच्या पात्रातून अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करत होते.गोपनीय विभागाकडून माहिती घेऊन उपविभागीय अधिकारी शशिकांत हातगल, सपोनि हनुमंत वारे यांनी गोरी-गंधारी नदीपात्रात छापा टाकला.यावेळी ८ ट्रॅक्टर-ट्रॉलीसह अवैध वाळू उत्खनन करताना आढळून आले. उपविभागीय अधिकारी शशिकांत हातगल यांच्या मार्गदर्शनाखालीतलाठी अभिजीत देशमुख यांच्या फिर्यादीवरून विलास खेडेकर, लखन परदेशी, शाहरूख मकबूल शेख, फिरोज मकबूल शहा, मुक्तार अकबर शहा, मोबीन अकबर शहा, (रा.सर्व शहागड), माऊली खरात (रा.गोंदी), दादा माळी (रा. सावरगाव ता.गेवराई) या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ट्रॅक्टर-ट्रॉलीसह अवैध वाळू असा एकूण ५६ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तपास जमादार भास्कर आहेर करत आहेत. दरम्यान, पोलीस प्रशासन व महसूलच्या पथकांनी अवैध वाळू वाहतुकीविरूध्द कारवाईचा बडगा उगारल्याने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे.

टॅग्स :sandवाळूSmugglingतस्करीRevenue Departmentमहसूल विभाग