जिल्हा आरोग्य प्रशासनाला शनिवारी १११९ जणांच्या तपासणीचा अहवाल प्राप्त झाला. बाधितांमध्ये जालना शहरातील एक तर तालुक्यातील खणेपुरी एक, सामनगाव येथील एकास कोरोनाची बाधा झाली. परतूर शहरातील एकास कोरोनाची लागण झाली. अंबड तालुक्यातील दहेगाव येथील चौघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जाफराबाद तालुक्यातील जवखेडा येथील एकास कोरोनाची बाधा झाली. पॉझिटिव्हिटी रेट ०.८ वर गेला असून, एकूण पॉझिटिव्हिटी रेट १४.०९ टक्के आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६१ हजार ७६१ वर गेली असून, त्यातील ११९० जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात २८ सक्रिय रुग्ण
जिल्ह्यात सध्या २८ कोरोनाबाधित रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली आहे. असे असले तरी रुग्ण आढळून येत आहेत. आढळून येणारे रुग्ण पाहता नागरिकांनी मास्क वापरासह इतर प्रशासकीय सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.