लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरात कारमध्ये सट्टा चालविणाऱ्या एका व्यापाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री अटक केली. मनोज रमेशचंद्र अग्रवाल (३९, रा. कडबीमंडी) असे सट्टाबुकीचे नाव असून त्याच्याकडून ५ लाख ४१ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.शहरात मनोज रमेशचंद्र अग्रवाल हा व्यापारी एका महागाड्या कारमधून चालता- फिरता आयपीएलच्या सामन्यावर सट्टा चालवित असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी सापळा रचून अग्रवाल यास मोबाईलवर सट्टा खेळताना व खेळवितांना पंचशील हॉस्पिटल जवळ असलेल्या त्याच्या कारमध्ये (एमएच-२१. एएक्स.४५९) रंगेहाथ पकडले.सदर कारची व त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे तीन मोबाईल आढळून आले. सदर मोबाईलची पाहणी केली असता, मोबाईलमध्ये अनिल गव्हाणे, संदीप आमले (दोघे रा. रा. हिसवन, ता. जि. जालना), कैलास साकूंडे (रा. दुधना काळेगाव) यांच्या सोबत मोबाईल कॉल, एसएमएस व व्हॉटसअॅपद्वारे आयपीएलमध्ये चालू असलेल्या सामन्यावर सट्टा खेळत असल्याची समोर आले. राज्यस्तरीय बुकी नितीन अग्रवाल (रा. नागपूर) याच्या संपर्कात असल्याचे अग्रवाल त्याने सांगितले. याप्रकरणी सदरबाजार पोलीस ठाण्यात पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या ताब्यातून एक कार, तीन मोबाईल, असा ५ लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मनोज अग्रवाल याच्याविरुद्ध दोन वषार्पूर्वी देखील अशीच कारवाई करण्यात आली होती. अग्रवाल याचे कडबी मंडी भागात अग्रवाल सॅनिटेशन व हार्डवेअर नावाचे दुकान आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, उपनिरीक्षक जयसिंग परदेशी, ज्ञानेश्वर सानप, कर्मचारी कुरेवाड, कायटे, गडदे, देशमुख, अंबादास साबळे, कृष्णा तंगे, रंजित वैराळ, सागर बाविस्कर, मदन बहुरे यांनी केली.तीन वर्षात अकरा बुकींवर कारवाईभारतात आयपीएलचा मोठा क्रेझ आहे. त्यामुळे आयपीएलच्या सामन्यावर मोठ्या प्रमाणात सट्टे बाजी होते. यावर बंदी असतानाही बुकी सट्टे लावतात. जालना शहरातही मागील तीन वर्षांपासून याचे प्रमाण वाढले आहे. २०१७ साली शहरात प्रथमच एका बुकीवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर २०१८ मध्ये सट्टा लावणाऱ्यांमध्ये वाढ झाली. २०१८ मध्ये पोलिसांनी ८ जणांना ताब्यात घेतले होते. तर २०१९ मध्ये आतापर्यंत २ जणांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी दिली.
जालन्यात 'आयपीएल बेटिंग आॅन व्हील'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 12:00 AM