लोकमत न्यूज नेटवर्कजालना : एखाद्या शिक्षकाने मनावर घेतल्यावर त्या शिक्षण संस्थेत कसा चांगला सकारात्मक बदल होऊ शकतो हे मंठा येथील आयटीआयचे प्राचार्य देविदास राठोड यांनी केलेल्या प्रयत्नातून दिसून येते. दोन दिवसांपूर्वी मंठा येथील आयटीआयची डॉक्यूमेंटरी लातूर येथे कौशल्य विकास आणि उद्योग राज्यमंत्री संभाजीपाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या एका विशेष कार्यक्रमात सादर करण्यात आली. मंठ्यातील आयटीआयमध्ये राबविलेल्या विविध स्तुत्य उपक्रमांची दखल निलंगेकर यांनी घेऊन याच कार्यक्रमात मंठा येथील आयटीआयचे मॉडेल संपूर्ण राज्यात राबविण्याचे निर्देश दिले आहेत.चंद्रपूर तसेच लातूर जिल्ह्यातील आदर्श आयटीआय संदर्भातील कार्यशाळा भरविण्यात आली होती. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कौशल्य विकासमंत्री निलंगेकर याची उपस्थिती होती. यावेळी मंठा आयटीआयचे प्राचार्य देविदास देशमुख यांनी सांगितले की, मंठा येथील आटीआयमध्ये फिटर, डिझेल मॅकेनिक, वेल्डर, ड्रेसडिझाइन, काम्युटर आॅपरेटर असे ट्रेड आहेत.मंठा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीची उभारणी आपण येण्यापूर्वीच झाली होती. मात्र त्यातील सुविधा आणि नवीन संकल्पना राठोड यांनी सर्वांच्या मदतीने पुढाकार घेऊन राबविल्या. त्यात सध्या दोन डिजिटल क्लासरूम, अद्यायात आयटी लॅब, तसेच मुलांसाठी जीमची व्यवस्था आणि क्रीडाक्षेत्राला महत्व देत खो-खो, क्रिकेट, व्हॉलीबॉल आदींसाठी सुसज्ज मैदान तसेच ठिबक सिंचनाचा उपयोग करून लॉन जिवंत ठेवली आहे. तसेच श्क्षिणाच्या बाबतही ही संस्था अग्रेसर असून, विविध कंपन्यांच्या माध्यमातून येथे कँपस मुलाखती घेण्यात आल्या आहेत. त्यातून अनेकांना नोकरी तसेच स्वयंरोजार मिळाला आहे.सर्वांच्या मदतीनेच यशमंठा येथील आयटीआयमध्ये जालन्यातील उद्योजक, संजय राठी, मुकुंद मंत्री, किरण हंसोरा, अजय गट्टाणी हे आयएमसीचे सदस्य आहेत. त्यांनी देखील आम्हाला यासाठी मदत केली. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नाने जिल्हा नियोजन समितीतून दोन कोटी ७ लाख रूपये मिळाले होते. त्यातूनच बांधकाम विभागाने उत्कृष्ट नियोजन करून आम्हांला हवे असणारे बदल तसेच फर्निचर आणि अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या. तसेच आयटीआय मधिल सर्व निदेशकांनी देखील यासाठी मदत केली. आगामी काळात जर मंठा पॅटर्न यशस्वी झाल्यास त्यात सर्वांच्याच सहभागातून हे साध्य होणार असल्याचे प्राचार्य देविदास राठोड यांनी सांगितले.
आयटीआयचा मंठा पॅटर्न संपूर्ण राज्यभर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 12:45 AM