जालना : मराठी ही आपली मातृभाषा आहे. असे असतांना मराठीच्या पेपरलाही कॉप्या करण्याचे प्रकार उघडकीस आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एकीकडे प्रश्नपत्रिकेमध्ये सारांश दिलेला असतो तो वाचुनच विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. त्यासासठीही विद्यार्थ्यांकडून मराठीच्या पेपरला कॉपी करण्याचे प्रकार उघड झाल्याने जाहलो खरेच धन्य... मराठीलाही कॉपी असे म्हणण्या वाचून पर्याय राहिलेला नाही.दहावीच्या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात म्हणून यंदा बोर्डाने अधिकची खबरदारी घेतली आहे. असे असतांनाही शुक्रवारी मराठीच्यापरीक्षेला विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात कॉपी केल्याचे समोर आले आहे. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मंठा तालुक्यातील दोन विद्यालयातील चक्क १० विद्यार्थी कॉपी करताना पकडल्याने खळबळ उडाली आहे. मंठा तालुक्यातीलच दहिफळ खंदारे गावात मराठीचा पेपर व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्याने देखील एकच खळबळ उडाली.दहावीच्या परीक्षेत मोठ्या प्रमाणावर कॉपी करण्याचे प्रकार सुरू आहेत. कितीही सूचना दिल्यावरही विद्यार्थी मोठ्या चालाकिने कॉपी सोबत आणत असल्याचे भरारी पथकाच्या लक्षात आले. प्रारंभी परीक्षा केंद्रावर येतानाच विद्यार्थ्यांची कडक तपासणी करण्याचे निर्देश आहेत. अशाही स्थितीत विद्यार्थी शक्कल लढवून कॉपी परीक्षा केंद्रात आणत आहेत. शुक्रवारी मंठा तालुक्यातील रेणुकादेवी विद्या मंदिर शाळेत भरारी पथकाने अचानक भेट दिली. भरारी पथक आल्याचे कळल्यावर विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ उडाली. प्रत्येक विद्यार्थ्यांची तपासणी केल्यानंतर आठ विद्यार्थी कॉपी करतांना पकडले.तसेच मंठा तालुक्यातीलच छत्रपती संभाजी विद्यालयातील दोन विद्यार्थी कॉपी करत असल्याचे आढळून आले. या प्रकरणी दहा विद्यार्थ्यांना रस्टीकेट करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. बोर्ड कॉपी मुक्त परीक्षेचा दावा करत असतांनाच मराठीच्याच पेपरला कॉप्या सुरु आहे.जालना जिल्ह्यात ३१ हजार विद्यार्थी देतायत परीक्षादहावीच्या परीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. जालना जिल्ह्यात यंदा परीक्षेसाठी जवळपास ३१ हजार ५७२ विद्यार्थी बसले आहेत. परीक्षा केंद्रावर सुविधा देण्याबरोबरच विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, याची काळजी घेण्यात आली. कॉपी मुक्तीसाठी सहा भरारी पथकासह बैठे पथकही तैनात करण्यात आले आहे.
जाहलो खरेच धन्य... मराठीलाही कॉपी..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 12:29 AM
मराठी ही आपली मातृभाषा आहे. असे असतांना मराठीच्या पेपरलाही कॉप्या करण्याचे प्रकार उघडकीस आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
ठळक मुद्देजालना येथील प्रकार : अर्ध्यातासात प्रश्नपत्रिका व्हायरल, १० कॉपी बहादरांवर कारवाई, दोन तोतयावर गुन्हे दाखल