शहरं
Join us  
Trending Stories
1
Abandoned matches in Test Cricket, AFG vs NZ: अफगाणिस्तान-न्यूझीलंड कसोटी रद्द! भारतात कसोटी क्रिकेट इतिहासात 'असं' पहिल्यांदाच घडलं!
2
अरविंद केजरीवाल यांना जामीन देणारे न्यायाधीश कोण आहेत? पुढील वर्षी CJI होतील
3
"आता तुम्हाला आमचा विरोध दिसेल"; धारावी प्रकल्पाच्या भूमिपूजनावरुन वर्षा गायकवाडांचा इशारा
4
Arvind Kejriwal Bail : मुख्यमंत्री कार्यालयात जायचं नाही, फाईलवर सही करायची नाही; सहा अटी घालत अरविंद केजरीवालांना जामीन
5
अब तक १,000,000,000! एवढे 'फॉलोअर्स' कमावणारा रोनाल्डो जगातील पहिला अन् एकमेव माणूस
6
एनआयएची पंजाबमधील खलिस्तान्यांवर मोठी कारवाई; खलिस्तानी अड्ड्यांवर छापे
7
P N Gadgil ज्वेलर्सच्या IPO ला तुफान प्रतिसाद, आयपीओ लागला का नाही? 'असं' करा चेक
8
पाकिस्तानच्या बॅलिस्टिक मिसाइल मोहिमेला जबर धक्का; अमेरिकेने सप्लायर्सवर घातली बंदी
9
"बुरखा वाटपसारखे कार्यक्रम भाजपला मान्य नाहीत", आशिष शेलारांनी शिंदे गटाला सुनावले
10
मुलगी म्हणून मी कमी पडले! अंकिता वालावलकर भावुक, म्हणते-"शाडुच्या मातीची २-३ फूट मूर्ती उचलणं मला..."
11
Aadhaar Card Update : तुमचं Aadhaar Card १० वर्ष जुनं आहे? त्वरित करा मोफत अपडेट; राहिलेत अखेरचे २ दिवस
12
रायबरेलीतल्या सलून चालक अन् मोचीला राहुल गांधींचं रिटर्न गिफ्ट; दोघेही झाले खुश
13
'अरे'ला 'का रे' करायला हवं, त्यांना तीच भाषा कळते; सुनील गावसकर का, कुणावर चिडले?... वाचा!
14
ऑडी अपघातापूर्वी हॉटेलमध्ये गेलेल्या संकेत बावनकुळेचे CCTV फुटेज गायब; पोलिसांची माहिती
15
Bajaj Housing Finance: लिस्टिंगच्या दिवशी होणार का पैसे दुप्पट? किती आहे GMP; कधी होणार लिस्ट?
16
विचारसरणीशी प्रतारणा न करणारे फक्त कम्युनिस्टच उरले; येचुरींना श्रद्धांजली वाहताना राज ठाकरेंचे उद्गार 
17
IND vs BAN: टीम इंडियाला 'या' ६ बांगलादेशी खेळाडूंपासून धोका, पाकिस्तानात घातला धुमाकूळ
18
CM केजरीवालांना जामीन मिळताच शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, "एक गोष्ट स्पष्ट झाली की...";
19
Ganesh Chaturthi 2024: चेंगराचेंगरीत न अडकताही 'या' दोन मार्गांनी होऊ शकते बाप्पाची कृपा!
20
Hindenburg Vs Adani Group: 'अदानी समूहाचे स्विस बँक खाती फ्रीज', हिंडेनबर्गचे आरोप; समूहाची प्रतिक्रिया, म्हणाले...

जालनेकरांचा यंदा रावसाहेब दानवे यांनाच 'चकवा'; 'कांटे की टक्कर' कल्याण काळेंनी जिंकली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2024 8:06 PM

Jalana Lok Sabha Result 2024:केंद्रीय राज्यमंत्र्याच्या पराभवाने भाजपाला धक्का बसला आहे.

Jalana Lok Sabha Result 2024: जालना लोकसभेत मोठा उलटफेर झाला असून ३५ वर्षांपासूनचा भाजपा गड यावेळी ढासळला. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा कॉँग्रेसचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांनी दारुण पराभव करत 'कांटे की टक्कर' जिंकली. काळे यांच्या विजयामुळे यंदा रावसाहेब दानवे यांनाच 'चकवा' मिळाल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे.

१९८९ पासून जालना लोकसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात होता. त्यानंतर १९९१ च्या अंकुशराव टोपे यांच्या कॉग्रेसच्या विजयाचा अपवाद वगळता १९९६ पासून या मतदारसंघात कॉग्रेसला विजय मिळालेला नाही. काॅग्रेससाठी नेहमी पडणारी जागा, असा राजकीय इतिहास डॉ. काळे यांनी शानदार विजय मिळवत पुसून टाकला. रावसाहेब दानवे यांचे जालना लोकसभा मतदारसंघातून सलग सहाव्यांदा विजय मिळविण्याचे स्वप्न भंगले असून केंद्रीय राज्यमंत्र्याच्या पराभवाने भाजपाला धक्का बसला आहे.

पहिल्या तीन-चार फेरींमध्ये केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, डॉ. कल्याण काळे यांना समसमान मते मिळत होती. परंतु, पाचव्या फेरीनंतर मविआचे डॉ. कल्याण काळे यांनी घेतलेली आघाडी १६ व्या फेरीपर्यंत कायम होती. डॉ. काळे यांना ५ लाख ८३ हजार ११२ मते मिळाली होती. तर दानवे यांना ४ लाख ८१ हजार ३९८ मते मिळाली होती. काळे यांनी १ लाख १ हजार ७१४ मतांची आघाडी घेत विजय निश्चित केला. विशेष म्हणजे, अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांनी १ लाख ४८ हजार ७३२ मते मिळवत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

टॅग्स :jalna-pcजालनाlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Kalyan kaleडॉ. कल्याण काळेraosaheb danveरावसाहेब दानवे