जालना : कुणाचाही कधीच अपघात होऊ नये. पण वेळ सांगून येत नाही. बऱ्याचदा अपघात झाल्यावर वेळेत मदत मिळत नाही. अशा परिस्थिती अपघातग्रस्तांच्या नातेवाइकांसह पोलिस व रुग्णवाहिकेला त्वरित अलर्ट देणारी ॲक्सिडेंट अलर्ट सिस्टीम अंबड तालुक्यातील राजेंद्र पाचफुले या युवकाने विकसित केली आहे. दुचाकीत ही किट बसवल्यानंतर अपघात झाल्यास तत्काळ पोलीस, रुग्णवाहिका आणि नातेवाईकांना मेसेज, कॉल आणि अपघात ज्या ठिकाणी झाला त्या लोकेशनही या सीस्टीमच्या माध्यमातून मिळणार आहे.
अंबड तालुक्यातील दुधपुरी येथील शेतकरी कुटुंबातील राजेंद्र पाचफुले हा युवक बी.ए. प्रथम वर्षाचे शिक्षण घेत आहे. त्याने हलाखीच्या परिस्थितीत हे यंत्र साकारले आहे. त्याच्या या किटची यशस्वी चाचणी झाली असून, यासाठी त्याला ५ हजाराचा खर्च आला आहे. राजेंद्रने बनवलेल्या या ॲक्सिडेंट अलर्ट सिस्टीम किटचं सर्वत्र कौतुक होत आहे. या किटमुळे वाहनाचा अपघात होताच त्याची माहिती तत्काळ नातेवाईकांना मिळण्यास मदत होणार आहे. याशिवाय वाहन चोरी गेल्यास ते ट्रॅक करण्यासाठी देखील याची मदत होऊ शकते, असे राजेंद्रने सांगितले.
राजेंद्रने ही ॲक्सिडेंट अलर्ट सिस्टीम ग्लोबल कम्युनिकेशन आणि ग्लोबल पोजिसिंग सिस्टीम तंत्राचा वापर करून तयार केली. जीपीएस, अँड्रॉइड, जीएसएम आणि कोडिंग सॉफ्टवेअर सेन्सर्सचा यात वापर करण्यात आला आहे. ही किट दुचाकीला बसवून त्याने ५५ ते ६० किमी प्रतितास वेगाने दुचाकीचा अपघात घडवून आणला. या चाचणी दरम्यान दुचाकीला अपघात होताच सिस्टिमधील व्हायब्रेट सेंसर ॲक्टिव्ह झाले. त्यानंतर अँड्रॉइड आरडीओ सिस्टीम ॲक्टिव्ह होऊन जीपीएस सिस्टीमला आणि जीपीएस सिस्टीमने जीएसएम सिस्टिम ॲक्टिव्ह केले. यानंतर त्याच्या मोबाईलवर टेक्स्ट मॅसेज, कॉल आणि अपघाताचे लाईव्ह लोकेशन मिळाले.
कशी सुचली कल्पनाकॉलेजला जाताना अनेक अपघात राजेंद्र पाहिले. काहींना वेळेत मदत न मिळाल्याने त्यांचा जीव जाताना त्याने पाहिले. अपघातानंतर जखमींना मदत करण्याची इच्छा असूनही काहींना ती करता येत नाही. हे चित्र बदलण्यासाठी व अपघातातील व्यक्तीचा जीव वाचावा म्हणून त्याच्या डोक्यातअपघातानंतर तत्काळ त्याची माहिती रुग्णवाहिका, पोलीस आणि नातेवाईकांना मिळाली तर, अशी कल्पना त्याच्या डोक्यात आली. ॲक्सिडेंट अलर्ट सिस्टीमचा विचार आला. ती प्रत्यक्षात त्याने उतरवून दाखवली.