अंबड : शहरापासून जवळच असलेल्या डावरगाव शिवारातील बजाज ट्रेडर्स या देशी दारूच्या गोडाऊनमधून शटर तोडून चोरट्यांनी लाखोंची दारू पळवल्याची घटना उघड झाली आहे. ही घटना १५ ते १६ एप्रिल दरम्यान घडल्याची माहिती आहे.
शहरातील व्यापारी शिवाजी शामलाल बजाज यांचे अंबड शहरापासून जवळच डावरगाव शिवारातसं. नं 119 मध्ये बजाज ट्रेडर्स या नावाचे देशी दारूचे होलसेल विक्रीचे गोडाऊन आहे. १५ ते १६ एप्रिलच्या दरम्यान शटर तोडून चोरट्यांनी गोडाऊनमध्ये प्रवेश केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मोडतोड करत चोरट्यांनी देशी दारूचे सहा लाख पाच हजार दोनशे वीस रुपये किमतीचे बॉक्स लंपास केले.
चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर कर्मचाऱ्यांनी गोडाऊनचे व्यवस्थापक व मालक यांना माहिती दिली. त्यानंतर मालक शिवाजी बजाज यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 17 एप्रिल रोजी रात्री अंबड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 331(4)305 नुसार अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पीएसआय रंजना बागलाने पुढील तपास करत आहेत.