जिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार ५८२ जणांना कोरोनाची लागण झालेली आहेत. तर १२ हजार ०३२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ३३३ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवाव लागला आहे. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जालना जिल्ह्याचा रिकव्हरी रेट चांगला आहे . मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्याचा सर्वाधिक ९६.५ टक्के रिकव्हरी रेट आहे. त्यापाठोपाठ जालन्याचा क्रमांक लागतो.
राज्याचा विचार केल्यास राज्याचा रिकव्हरी रेट ९२.४९ टक्के आहेत. त्या तुलनेत जालन्याचा रिकव्हरी रेट जास्त आहे. राज्यात पालघर जिल्ह्याचा सर्वाधिक रिकव्हरी रेट आहे. त्यानंतर अहमदनगर, हिंगोली, जळगाव, नाशिक, रायगड, अमरावती, गोदिया, सांगली, धुळेनंतर जालन्याचा क्रमांक लागतो. जालन्यानंतर कोल्हापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, गडचिरोली, लातूर, बीड, अकोला, भंडारा, नंदुरबार, रत्नागिरी आदी जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.
दरम्यान, जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रूग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. असे असले तरी विदेशात कोरोनाने रूप बदल्याने रूग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. असे असतानाही जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात नाही. अनेकजण विनामास्क रस्त्यावर फिरताना दिसत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
जालन्यात २१६ सक्रिय रूग्ण
राज्यात हिंगोली जिल्ह्यात केवळ ५५ सक्रिय रूग्ण आहेत. त्यापाठोपाठ परभणी २०३, पालघर २१३ आणि जालन्यात २१६ रूग्ण सक्रिय आहेत. त्यानंतर वाशिम २२०, उस्मानाबाद २५५ तर सांगली जिल्ह्यात २६७ सक्रिय रूग्ण असल्याचे सांगण्यात आले. सदर आकडेवारी ही मंगळवारपर्यंतची आहे.